20 trekkers stuck at harishchandragad while rappeling 25.11.2018 Safe/rescued
---------------------------- Arun Sawant November 28 at 4:26 PM फेसबुक वरील माझ्या प्रिय गिर्यारोहक मित्रांनो .... ! दोन दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडावरील कोकण कडा येथे झालेल्या रॅपलिंग कॅम्पमध्ये निर्माण झालेल्या अडचणी व त्या अडचणीतून सर्व गिर्यारोहकांची सहीसलामत झालेली सुटका याबद्दल माझ्या कानावर बरेच काही आले .... तसेच फेसबुक वरूनही होत असलेले आरोप प्रत्यारोप वाचनात आले ....! म्हटलं जे जे कोणी यात involve होते त्यांचेशी प्रत्यक्ष फोन करून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी व आपले मत मांडावे ... म्हणून मी त्या रॅपलिंग कॅम्पचा आयोजक राज पालकर, अनिल वाघ, गणेश गिद, निवृत्ती मुठे यांचेशी फोनवर सविस्तर बोललो व अथपासून इथपर्यंत पूर्ण माहिती घेतली .... ! केवळ गैरसमजातून म्हणा की हेतुपुरस्सर माहीत नाही ... पण बऱ्याच चुकीच्या बातम्या मीडियातून प्रसारित झाल्या अन सर्वच महाराष्ट्राचे व खास करून आपल्या गिर्यारोहकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले .... पण त्यामुळे आपले गिर्यारोहण जगत बदनाम झाले एवढे नक्की ....! त्यानंतरही अनेक जणांनी फेसबुक वर आपापली मते मांडली .... त्यात गैर काहीच ...