Trekking safety news and other concerns from various channels july 2017
_____दोन घटना या वर्षीच्या मान्सून भटकंतीची सुरुवात करुन गेल्या. पेब(विकटगड)चा किल्ला या घटनेतील दोघे जण वाचले. व दुसरी घटना माणगाव रायगड देवकुंडात दोघे जण वाहून गेले. त्यांचे मृतदेह सापडले. मृतांपैकी एक दिल्लीचा तर एक वाराणसीचा खर तर या परप्रांतियांना येथील काही माहित नाही.सह्याद्री माहित नाही.कुण्या एका ट्रेक ऑर्गनायझर च्या भूलथापांना व अमिषांना बळी पडत ते ही जातात मग,एन्यॉय करायला व आयुष्याचा एन्जॉय होऊन बसतो. काल परवा एका भटक्याने हरीहर गडावर झालेल्या त्याच्या सोबतचे काही क्षण त्याने शेअर केले.ट्रेक ऑर्गनायझरचा मुर्खपणा,कोणतेही प्रथमोपचाराचे साहित्य नाहि.त्या ठिकाणची पुर्ण माहिती नाही.पायाचे हाड तुटले त्याचे एक्स रे पाठविले होते. ______माझ्यासारख्या नवख्यांना तर हे तथाकथीत बाजार मांडणारे फाट्यावर मारतच असतात.पण जुन्या जाणत्यांनाही मोजत नाहित. मी कुठलाही इव्हेंट सोशल मिडीयावर पाहिला की त्या नंबरवर पहिला फोन करतो.उगाच आपल वेड्यासारख त्याला सर सर म्हणायच.. सर जागा मिळेल का...? सर मी या आधि कधी किल्ला पाहिला नाहि.तो म्हणतो तुम्ही फक्त फी भरा बाकी पाहतो.(म्हणजे, सदर सदस...