Posts

Showing posts from December 17, 2019

bee attack on Kenjalgarh on December 14th

नुकतेच तोरण्यावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्याबद्दल ऐकिवात आले आणि त्या ओघाने येणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी चे उपाय सुद्धा वाचले. ही पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य असा की नुकतेच आम्ही सुद्धा 14 डिसेंबरला केंजळगड वर मधमाश्यांच्या हल्ल्या पासून थोडक्यात बचवलो. इतके वर्ष फक्त ऐकले होते अश्या प्रसंगाबद्दल पण यावेळी पहिल्यांदा आमच्यावर हा प्रसंग ओढवला. सकाळी 10.30 च्या सुमारास आम्ही 5 जण केंजळवाडी मध्ये पोहोचलो आणि लगेच ट्रेक चालू केला.केंजळवाडी मधून गड्याच्या माथ्यावर पोहोचायला साधारण 20 ते 30 मिनिटे लागली....मध्ये रस्त्यात गुहेमध्ये 5 ते 6 पोरांचे टोळके बसलेले आणि काही तरी शिजवण्याचे प्लॅन करत होते. सध्या रानफुलांचा सीझन असल्यामुळे गडमाथा उंच उंच रानफुलांच्या रोपट्यांनी बहरलेला होता. तिथून कमळगड आणि आसपाच्या परिसर न्याहाळून आम्ही परत गावाकडे उतरायला सुरवात केली. केंजळगड च्या पायऱ्या या उभ्या दगडात खोदलेल्या स्थापत्यशास्त्रचा उत्तम नमुना आहे. आम्ही पायऱ्यां पर्यंत पोहोचतो तोच आमच्या बाजूला मधमाश्या घोंघावायला सुरुवात झाली आणि बघता बघता मधमाश्यांच्या झुंड आमच्या आजूबाज...