Man loses balance at harihar and dies 30.8.2025

हरिहरगडावरून पडून भंडाऱ्याच्या ट्रेकरचा मृत्यू एक दिवस आधी सर केले होते कळसुबाई शिखर https://deshdoot.com/nashik-news-tourist-dies-after-falling-into-a-gorge-at-harihar-forts/ प्रतिनिधी | भंडारा नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका ट्रेकरचा खाली उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. आशिष टीकाराम समरीत (२१, रा. खुमारी, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष टीकाराम समरीत हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) गेला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले. शनिवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजताच्या सुमारास ते हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेले. या वेळी उतरत असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या कारणांमुळे येथे ट्रेकिंग कठीण: सुमारे ६० ते ९० अंशांच्या कोनात कोरलेल्या खडकाळ पायऱ्या, दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या, पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ, अनेक भाग सुरक्षा कठड्याविना आहेत. त्यामुळे हा गड चढाई करण्यास अतिशय कठीण आहे. ...