State of the sahyadri article by Parag Limaye Jul 15, 2018 (marathi)
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा!' असं आपल्या महाराष्ट्राचं काव्यात्मक वर्णन केलं जातं. या पंक्तीत महाराष्ट्र-पुरुषाचं जे रांगडे रूपकात्मक वर्णन आलं आहे त्याचं मूळ इये देशीच्या सह्याद्री पर्वत आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राचा कणाच आहे. या डोंगररांगांतील गिरिशिखरांवर उभारलेल्या असंख्य गडकोटांचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. या गडकोटांवरूनच त्यांनी नूतनसृष्टी उभारली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंचे चरित्र आपण नीट अभ्यासले, तर असे लक्षात येते की शिवाजी महाराज आणि या किल्ल्यांचं एक अतूट नातं आहे. शिवरायांचा जन्म झाला एका किल्ल्यावर. त्यांचं कर्तृत्व बहरलं गडांच्या परिसरातच. त्याची पहिली राजधानी होती किल्ले राजगडावर. त्यानी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला तो रायगडावर आणि तेथेच त्यांचं महानिर्वाण झालं. केवळ विलक्षण योगायोगाच्या गोष्टी नव्हेत या! समाजमाध्यमांतील प्रचारामुळे आणि या गड-किल्ल्यांच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वाहतूक सुविधांमुळे आता गडावरती येणाऱ्या तरुणाईचा ओघ पूर्वीपेक्षा खूप वाढला आहे....