Posts

Showing posts from January 25, 2019

Lingana accident 25.1.2019

Image
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या लिंगाणा गडाचा सुळका चढताना दरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. हा तरुण पुण्याचा असून दीपक रोकडे असे त्याचे नाव आहे. रोकडे एका खासगी कंपनीत काम करीत होता. दरम्यान, लिंगाणा हा किल्ला चढाईसाठी अवघड मानला जातो. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. या किल्ल्यावर चढाईसाठी अनेक ट्रेकर्स चे ग्रुप जातात. या किल्ल्याची चढाई करताना दीपक रोकडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी इतर ट्रेकर्स आणि पोलीस यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. https://www.policenama.com/one-person-die-while-trekking-fort/ ENGLISH Pune: Polisamma Online - The information about the death of a young man collapses in the valley while the crevice of Lingna Gada along with the suburb of Raigad Fort. This young man is his name and Deepak Rokad...