Safety Lectures at nashik by Vanitya Girirohan Giribhraman 11 July 2019
पावसाळी भटकंतीला जाताय? पावसाळी भटकंती, ट्रेक विषयी वैनतेयचे मार्गदर्शन ८ जुलै २०१९ नाशिक: पावसाळ्यात सहलीवर किंवा भटकंती दरम्यान होणार्या संभाव्य दुर्घटनांच्य पार्श्वभूमीवर वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतिने येत्या गुरूवारी सुरक्षित भटकंती या विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात सह्याद्रीत भटकंती किंवा सहलींवर अनेक अपघात घडले असून काही अपघात घातक ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर वैनतेयच्या वतिने भटकंती म्हणजे काय? ट्रेक आणि ट्रेकिंग म्हणे काय? तयारी कशा पद्धतीने करावी, ठिकाणे कसे निवडावेत, प्रवासाचे नियोजन, नेतृत्व, निर्णय आदींविषयी या क्षेत्रातील अनूभवी मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम निशुल्क असून सुरक्षित भटकंती, सुरक्षित सहली याकरिता उपयोगी ठरेल. पालकांनी मुलांना काय खबरदारी घेण्यास सांगावी, त्यांना सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टीं सागव्या याचेही या प्रसंगी मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छूकांनी अधिक माहिती साठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - ९०११७०३७०३, ९३७३९००२१९. -- googl...