Nashik Climbers & Rescuers Association कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान april 2024
कोकणकडा रिकवरी ऑपरेशन एक आव्हान* https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/3696614530657113/ रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता एम एम आर सी सी मधून ओमकार ओम चा फोन आला कोकणकड्यावरून एका मुलीने सुसाईड केले आहे असा राजुर पोलीस स्टेशन मधून फोन आला आहे आपल्याला मदतीला बोलवत आहेत त्याप्रमाणे शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन असे जॉइंटली ऑपरेशन करायचे परंतु यामध्ये गणेश गिध यालाही ऍड करावे असे दयानंद कोळी यांनी सुचविले त्याप्रमाणे कॉन्फरन्स कॉल वरती गणेश गिधला घेण्यात आले आणि चर्चेअंती असे ठरले की गणेश गिध डेला ॲडव्हेंचर टीम आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनची टीम जॉईंटली ऑपरेशन चालू करेल त्यांना शिवदुर्ग गरज लागल्यास बॅकअप देईल ठरल्याप्रमाणे दोन्ही टीम सर्व आवश्यक साहित्यांची पॅकिंग करून रात्री आठ वाजता कोकणकड्याच्या दिशेने निघाली प्रवासादरम्यान मुरबाड मधून दीपक विसे तसेच कल्याण मधून सतीश बोबडे यांची शिवगर्जना ही टीम ही ऑपरेशन मध्ये जॉईन झाली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता राजूर पोलीस स्टेशन मध्ये क...