Rescue at peb fort 31.7.2021
माथेरान पेब किल्ला टे्किंगसाठी आलेला तरुण रस्ता चुकल्याने माथेरान प्रेस कल्बचे अध्यक्ष दिनेश सुतार मदतीसाठी धावले कर्जत दि.2 गणेश पवार थंड हवेचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानच्या डोंगराला लागूनच असलेला पेब कील्ला अर्थात विकट गड हा पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहे.अनेक हौशी महाविद्यालयीन तरूण तरुणी विकेंडमध्ये या निसर्गरम्य परिसरातील कड्यावरील गणपती तसेच पेब किल्ल्याला भेट देत असतात. ३१ जुलै रोजी डोंबिवली येथील १२ जणांचा ग्रुप ट्रेकिंग साठी पेब किल्ला येथे आला होता.या ग्रुपमध्ये ९ तरुणी ३ तरुण असा एकूण १२ जण रस्ता चुकल्याने घाबरलेल्या अवस्थेत पोलीसांकडे दूरध्वनी वरून मदतीसाठी धावा करत होता. सदर तरूण तरुणी फणसवाडी मार्गे ट्रेक करत करत सर्वजण पेब किल्ल्यावर पोहोचले होते. किल्ल्यावर मजा मस्ती करत ट्रीपचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर सायंकाळी घरी परतण्यासाठी परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला. वॉटर पाईप...