Posts

Showing posts from August 4, 2022

Kataldhar Waterfall Rescue 31st July 2022

Image
 Kataldhar Waterfall Rescue *कातळधार रेस्क्यू* रविवार दि. ३१ जुलै २२ रोजी कॉल आला की एक मुलगी कातळ धार धबधब्याजवळ पडली असून तिचा पाय फ्रॅक्चर असल्याने ति जागेवरून हालू शकत नाही . लगेचच टिम ची जुळवाजुळव करून रेस्क्यूसाठी निघालो . लोणावळ्यातून राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फणसराई च्या जवळ खाली दरीन कातळधार हा प्रचंड धबधबा कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी किवा दरीतील हा ट्रेक करण्यासाठी मुंबई पुण्याकडून अनेक ट्रेकर येत असतात . याच ट्रेकला सहा जणांचा एक ग्रूप आला होता . धबधब्याजवळ या ग्रुपमधील एक मुलगी येथील मोठ्या दगडावरून पाय घसरून पडली. यावेळी तिच्या पायाला प्रॅक्चर झाले . याठिकाणी दुसऱ्या ग्रुपबरोबर गेलेली प्राजक्ता बनसोड ( शिवदुर्ग सदस्या ) ही त्याठिकाणी होती . तिने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून फोन केला व मदतीची गरज असल्याचे सांगितले . साधारण पणे दिड तासात टिम घटनास्थळी पोहचली . पोहचल्यानंतर प्रथमोपचार करून स्ट्रेचरवर घेतले. घनदाट जंगलातून अतिषय अवघड व चढणीच्या वाटेने सदर जखमी मुलीला रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर अम्ब्यूलन्स मधून पुढील उपचारासाठी त्यांच्या ग्रुपबरोबर पाठवू