नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी
नियंत्रण करण्याचे अध्यादेश जारी तुर्तास बंदी नाही...पण जरा सबुरीने! गडकिल्ल्यांवर उसळणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला उपायोजना राबविण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या काही पदाधिकार्यांना या संबंधी माहिती दिली. मागच्या रविवारी हरिहर किल्ल्यावर अभूतपूर्व गर्दी उसळली होती. आज हरिहरवर फार मोठी गर्दी झाली नाही. गर्दीचे केंद्र लोणावळ्या जवळच्या लोहगड विसापूरकडे वळल्याचे चित्र बघायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार पुणे-लोणावळा लोकलमधून तब्बल दोन हजार पावसाळी पर्यटकांचा समुदाय माळवली स्थानकावर उतरताना बघितल्याचे वृत्त काही ट्रेकर्सनी दिले. वैनतेय गिरीभ्रमण संस्था व हिमालयन क्लब यांच्या वतिने कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बांफ माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी वैनतेयच्या पदाधिकार्यांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी या संबंधी माहिती दिली. या कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास...