Boy from kalyan falls of Irshalgad cliff and dies 30th december 2018
Kshitij Sangle (20) fell from a height of more than 250ft Irshalgad fort, located between Matheran and Panvel Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/67316373.cms Nisargamitra Panvel "धाडस एक ठरवून केलेले आणि एक अनुभव नसताना अविचाराने केलेले". दिनांक 30.12.2018 रोजी निसर्गमित्र ची 6 जणांची टीम पुढील वर्षी करायच्या काही नवीन मोहिमांची पूर्वतयारी करण्यासाठी पनवेल जवळील एका किल्यावर गेली होती. काही अनोळखी जागांची पाहणी करायची असल्यामुळे सावधगिरी म्हणून आवश्यक ती साधनसामग्री जवळ बाळगली होती. अप्पांच्या मार्गदर्शनाखाली अगदी वेळेत नियोजित ठिकाणी जाण्यात टीम ला यश मिळाले.दुपार उलटून गेली होती आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. सकाळ पासून खूपच चढउतार केल्यामुळे श्रम जरा अंगावर आले होते. मधल्या वाडीपर्यंत उतरताच काही वेळ विश्रांती घेऊ असा विचार करून सगळे विसावले. MMRCC च्या वॉटसप ग्रुप ला वेगळी रिंगटोन असल्यामुळे त्याच्यावर आलेला मेसेजने सगळ्यांची झोप उडवली,लगोलग रोहीत चा फोन आलाच.तेव्हा वाजले होते दुपारचे 4. बातमी होती इर्शाळला एक मुलगा पडल...