Posts

Showing posts from July 9, 2019

Harishchandragad Update 10.7.2019 (marathi)

हरीचंद्रगडावर किव्हा त्या परिसरात येताय तर कृपया लक्ष द्या सर्व ट्रेकर,पर्यटक,निसर्गप्रेमी, यांना कळवण्यात अत्यंत आनंद वाटतोय कि ग्रामपंचायत, वन विभाग, वन व्यवस्थापन समिती आणि गावकरी सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा निर्णय घेतला आहे हरीचंद्रगडाचे पावित्र्य राखण्यासाठी व अतिउत्साही, मद्यपान व धांगडधिंगा करून पर्यावरण दुषीत करणा- या पर्यटकांवर आळा बसण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती पाचनई ग्रामपंचायत व वनविभाग राजूर यांच्या मार्फत पाचनई येथे टोलनाक्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी व पर्यावरणाच्या काळजीपोटी व गावातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उपद्रव शुल्क, पार्किंगच्या माध्यमातून जमा होणा-या निधीचा विनियोग टोलवर काम करणारे कामगार, सुरक्षा दल,प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन कामातील कामगार व इतर पैसा गाव विकास व परीसर सुशोभीकरण यावर खर्च करण्यात येत आहे. व्हेकल्स चेक करूनच सोडल्या जाणार असून दारूबंदी आहे जर कुणी मद्यपी धांगडधिंगा करत असेल, अरेरावी करत असेल किंवा पर्यावरणाचा - हास करताना पकडला गेला तर त्यांच्य