Kataldhar Waterfall Rescue 31st July 2022

 Kataldhar Waterfall Rescue

*कातळधार रेस्क्यू*

रविवार दि. ३१ जुलै २२ रोजी

कॉल आला की एक मुलगी कातळ धार धबधब्याजवळ पडली असून तिचा पाय फ्रॅक्चर असल्याने ति जागेवरून हालू शकत नाही . लगेचच टिम ची जुळवाजुळव करून रेस्क्यूसाठी निघालो . लोणावळ्यातून राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फणसराई च्या जवळ खाली दरीन कातळधार हा प्रचंड धबधबा कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी किवा दरीतील हा ट्रेक करण्यासाठी मुंबई पुण्याकडून अनेक ट्रेकर येत असतात . याच ट्रेकला सहा जणांचा एक ग्रूप आला होता . धबधब्याजवळ या ग्रुपमधील एक मुलगी येथील मोठ्या दगडावरून पाय घसरून पडली. यावेळी तिच्या पायाला प्रॅक्चर झाले . याठिकाणी दुसऱ्या ग्रुपबरोबर गेलेली प्राजक्ता बनसोड ( शिवदुर्ग सदस्या ) ही त्याठिकाणी होती . तिने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून फोन केला व मदतीची गरज असल्याचे सांगितले .

साधारण पणे दिड तासात टिम घटनास्थळी पोहचली . पोहचल्यानंतर प्रथमोपचार करून स्ट्रेचरवर घेतले. घनदाट जंगलातून अतिषय अवघड व चढणीच्या वाटेने सदर जखमी मुलीला रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर अम्ब्यूलन्स मधून पुढील उपचारासाठी त्यांच्या ग्रुपबरोबर पाठवून दिल .

* शिवदुर्ग टिम*

रोहीत वर्तक, समिर जोशी, योगेश उंबरे, अमोल परचंड, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू, कुणाल कडू , अशोक उंबरे, चैतन्य वाडेकर, प्रणय आंभुरे, हेमंत पाटील, प्राजक्ता बनसोड, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, तुषार सातकर, सचिन वाडेकर, यश वाडेकर, मुंबई ट्रेकर - लियांडर वाझ, जोयेल विल्फ्रेड, सुशांत वायदंडे, व जय सोनार अमोल चिनुरे.

#rescue #savelife #socialwork #humanity #mountain #outdoors #mountainrescue #trekkingindia #waterfalls #accident #quickresponse





Comments

Popular posts from this blog

student falls at Peb Fort in Karjat Taluka 18.6.2024

Man falls into valley from Mahuli Fort 10.5.2024

Kalu Waterfall will remain strictly closed from tomorrow till further notice