Man loses balance at harihar and dies 30.8.2025
हरिहरगडावरून पडून भंडाऱ्याच्या ट्रेकरचा मृत्यू
एक दिवस आधी सर केले होते कळसुबाई शिखर
https://deshdoot.com/nashik-news-tourist-dies-after-falling-into-a-gorge-at-harihar-forts/
प्रतिनिधी | भंडारा
नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या भंडारा जिल्ह्यातील एका ट्रेकरचा खाली उतरताना पडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. आशिष टीकाराम समरीत (२१, रा. खुमारी, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष टीकाराम समरीत हा त्याच्या साथीदारांसोबत पर्यटनासाठी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) गेला होता. त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केले. शनिवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजताच्या सुमारास ते हरिहर गडावर ट्रेकिंगसाठी गेले. या वेळी उतरत असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या कारणांमुळे येथे ट्रेकिंग कठीण: सुमारे ६० ते ९० अंशांच्या कोनात कोरलेल्या खडकाळ पायऱ्या, दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या, पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ, अनेक भाग सुरक्षा कठड्याविना आहेत. त्यामुळे हा गड चढाई करण्यास अतिशय कठीण आहे.
Bhandara trekker dies after falling from Harihargad
Had summited Kalsubai Peak a day earlier
Representative | Bhandara
A trekker from Bhandara district who had gone for trekking to Harihargad in Nashik district fell to his death while descending today. The deceased has been identified as Ashish Tikaram Samrit (21, resident of Khumari, Bhandara district).
According to the information received, Ashish Tikaram Samrit had gone for tourism with his companions on Friday (August 29). He completed Kalsubai Peak. On Saturday, August 30, around 1 am, he went for trekking to Harihargad. While descending at this time, around 12 noon, Ashish Samrit lost his balance and fell 100 feet. He died on the spot.
Trekking here is difficult due to these reasons: rocky steps carved at an angle of about 60 to 90 degrees, deep valleys on both sides, moss on the steps during the monsoon, many parts without safety barriers. Therefore, this fort is very difficult to climb.
Comments
Post a Comment