bee attack on Kenjalgarh on December 14th


नुकतेच तोरण्यावर झालेल्या मधमाश्यांच्या हल्याबद्दल ऐकिवात आले आणि त्या ओघाने येणाऱ्या मधमाश्यांच्या हल्ल्या पासून वाचण्यासाठी चे उपाय सुद्धा वाचले.

ही पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य असा की नुकतेच आम्ही सुद्धा 14 डिसेंबरला केंजळगड वर मधमाश्यांच्या हल्ल्या पासून थोडक्यात बचवलो. इतके वर्ष फक्त ऐकले होते अश्या प्रसंगाबद्दल पण यावेळी पहिल्यांदा आमच्यावर हा प्रसंग ओढवला.

सकाळी 10.30 च्या सुमारास आम्ही 5 जण केंजळवाडी मध्ये पोहोचलो आणि लगेच ट्रेक चालू केला.केंजळवाडी मधून गड्याच्या माथ्यावर पोहोचायला साधारण 20 ते 30 मिनिटे लागली....मध्ये रस्त्यात गुहेमध्ये 5 ते 6 पोरांचे टोळके बसलेले आणि काही तरी शिजवण्याचे प्लॅन करत होते. सध्या रानफुलांचा सीझन असल्यामुळे गडमाथा उंच उंच रानफुलांच्या रोपट्यांनी बहरलेला होता. तिथून कमळगड आणि आसपाच्या परिसर न्याहाळून आम्ही परत गावाकडे उतरायला सुरवात केली. केंजळगड च्या पायऱ्या या उभ्या दगडात खोदलेल्या स्थापत्यशास्त्रचा उत्तम नमुना आहे. आम्ही पायऱ्यां पर्यंत पोहोचतो तोच आमच्या बाजूला मधमाश्या घोंघावायला सुरुवात झाली आणि बघता बघता मधमाश्यांच्या झुंड आमच्या आजूबाजूला फिरायला लागला...आम्ही तिथून निघणार तेव्हढयात अक्षयच्या नाकाला मधमाशी चावणार तेवढ्यात त्याने ती झटकली आणि बाकीच्या माश्यांना हातवारे करत पळवायला लागला .....आणि थोड्याच वेळात बघता बघता मधमाश्या अक्षय च्या मागे लागल्या....त्या पासून वाचण्यासाठी तो पायऱ्या पटापट उतरून पळाला लागला....पण मधमाश्या काही त्याचा पाठलाग सोडायला तयार नव्हत्या. आम्ही बाकीचे जवळ असून सुद्धा त्या आम्हाला तेव्हढ्या त्रास देत नव्हत्या. आम्ही खाली उतरून गुहेत शिरलो आणि अक्षय ला गुहेमधे बोलावून घेतले.....तो कसा तरी माश्यांपासून सुटका करू गुहेत शिरला तेव्हा तो घामाने अक्षरशः डबडबला होता आणि माश्यांनी त्याच्या हाताचा आणि कानाचा चावा घेतलेला. त्याला चावा घेतलेल्या ठिकाणी अतिशय झोंबायला लागले आणि जागा खूप लाल झाली. आम्ही सगळ्यात पाहिले त्याच्या अंगावरून 12 ते 15 काटे काढले आणि गुहेमधली काळी माती दंश झालेल्या ठिकाणी लावली.

साधारण अर्धा तास आम्ही गुहेत बसून होतो आणि गुहेच्या बाहेर माश्या घोंघावत होत्या. थोड्या वेळाने असे लक्षात आले की गड चढताना जी 5 ते 6 पोरं गुहेत होती त्यांनी खिचडी करायला घेतली होती त्यांनी काटक्यांच्या ऐवजी वाळलेले गवत वापरले आणि त्या मुळे प्रचंड धूर झाला ज्याच्यामुळे मधमाश्यांचे पोळे उठले होते.

साधारण पाउण तासाने आम्ही हळू हळू एक एक करत खाली उतरायला सुरुवात केली..... आम्ही खाली उतरायला लागल्यावर परत माश्यांचा घोळका आमच्या जवळ घोंघावू लागला....आम्ही लगेच तिथल्या तिथे रस्त्यात काहीही हालचाल न करता निपचीत झोपून राहिलो.....माश्या साधारण 15 ते 20 मिनिटे घोंगवायच्या आणि निघून जायच्या. साधारण 2 ते 3 वेळा आम्हांला असे करावे लागले आणि फायनली आम्ही गावात पोहोचलो.

अक्षय आणि दीपाली यांना जास्त दंश झाल्यामुळे त्यांना अंगावर सूज आली आणि दंश झालेली जागा लाल झाली होती. नंतर अक्षय ला थंडी भरून आली आणि जॉइंट पेन सुरू झाले. त्यांना भोर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघांना avil Inj आणि TT चे inj दिले आणि आराम करण्याचा सल्ला दिला.

स्वानुभवातून सांगायच्या काही गोष्टी -:

१. आपण स्वतः किती ही काळजी घेतली तरी काही हौशी लोकांच्या चुकीमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो तेव्हा ट्रेक मध्ये आपल्या लोकांबरोबरच गडावर आलेल्या इतर लोकांपैकी कोणी काही चुकीचे करत असल्यास त्यांना विरोध करणे गरजेचे आहे.

२. मधमाशी कुठल्या रंगाची होती हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे (भोर रुग्णालयात आम्हाला डॉक्टरांनी माशी कुठल्या रंगाची होती या बाबत विचारले होते त्या वरून डॉक्टरांची ट्रीटमेंट ठरते)

३. मधमाश्यांचा हल्ला झाल्यावर जास्त हालचाल करू नये जेवढे शक्य तेवढे निपचीत पडून राहावे. त्यांना हाकलण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये.

४. ट्रेक मध्ये फुल शर्ट आणि पँट घालावी आणि आपले अवयव शक्य तेवढे झाकून घ्यावे. जवळ एक टॉवेल किंवा शाल बाळगावी,अश्यावेळी तोंड झाकून घ्यायला उपयोगी पडते

५. लवकरात लवकर जवळ चे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे जेणेकरून लवकरात लवकर उपचार सुरू करता येतील.

६. जवळ प्रथमोपचार ची पेटी बाळगावी ज्यामध्ये किड्याच्या दंश वरची काही औषधे असावी.

अश्विन




Kenjalgarh, we and the bees attack ...

Recently the bees were killed in the wake of the bees, and the measures were also taken to protect them from the incoming bee attack.

The motive behind writing this post is that we recently survived a brief bee attack on Kenjalgarh on December 14th. It was the first time we had heard of such an event for the first time, but this time for the first time, it struck us.

About 10.30 in the morning we reached 5 kenjalwadi and immediately started the trek. It took about 20-30 minutes to reach the top of the fort from kenjalwadi. At present, because of the flowering season, Gadmatha was surrounded by tall tall plantains. From there, taking a look at the lotus and surrounding area, we started heading back to the village. The steps of Kenjalgarh are a fine example of architectural excavation in this vertical stone. As we reach the stairs, the bees start snailing at us and looking around, a flock of bees begins to move around us. Looking at the bees, Akshay followed. To escape from it, he stepped up and down the steps .... but some of the bees were not ready to give up on him. Even though we were close to the rest, they didn't bother us that much. We got down and entered the cave and called Akshay to the cave ..... When he got into the cave somehow he was almost overwhelmed by the sweat and the fish took the bite of his hand and ear. The place where he was bitten was very zombie and the place became very red. All we saw was 12 to 15 bites from his body and the black soil in the cave was planted in a stained area. When he went into the cave to get rid of the fish somehow, he was almost overwhelmed by the sweat and the fish took the bite of his hand and ear. The place where he was bitten was very zombie and the place became very red. All we saw was 12 to 15 bites from his body and the black soil in the cave was planted in a stained area. When he went into the cave to get rid of the fish somehow, he was almost overwhelmed by the sweat and the fish took the bite of his hand and ear. The place where he was bitten was very zombie and the place became very red. All we saw was 12 to 15 bites from his body and the black soil in the cave was planted in a stained area.

For about half an hour we were sitting in the cave, and outside the cave there were snails. After a while, it was noticed that during the ascent of the citadel, which was in the cave for 5 to 6 pores, they used to mop up.

After about an hour we slowly started descending one by one ..... Once we started descending, the flock of fish started to sniff at us .... we immediately fell asleep there without any movement in the road. The fish would roam for about 15 to 20 minutes and leave. About 2 to 3 times we had to do this and finally we reached the village.

Akshay and Deepali got swollen due to excessive bite and the place was stained red. Then Akshay got cold and the joint pen started. After taking them to Bhore Rural Hospital, doctors gave both avil Inj and TT injections and advised them to relax.

Few things to say -

१. No matter how much we care about ourselves, some amateur people may have to suffer because of wrongdoing.

२. It is important to remember what color the bee was (in the morning hospital we were asked by the doctor about the color of the fly.

३. Avoid excessive movement as the bees attack, as much as possible. Don't try to drive or kill them.

४. Put a full shirt and pants on the trek and cover your body as much as possible. It is useful to have a towel or shawl around, while covering the mouth

५. Get to the nearest primary health center as soon as possible so that treatment can be initiated as soon as possible.

६. There should be a first aid box containing some medications on insect bites.

Ashwin

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023