Skip to main content

Mr Arun Sawant - Views on this years 2017 safety news 11.07.2017

आजकाल गिर्यारोहण करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे ..... ही चांगलीही बाब आहे अन वाईटही .....!

किती ग्रुप्सनी एखाद्या ठिकाणी जावे अन एका ग्रुपमध्ये किती शिबिरार्थी न्यावेत याचा काही ताळतंत्र राहिलेला नाही .... आपला ग्रुप कसा लवकर पुढे नेता येईल यात स्पर्धा निर्माण होते .... त्यामुळे जिथे bottle neck points असतात तिथे अपघात होण्याची शक्यता वाढते ..... आजकाल होणाऱ्या अपघातामुळे ही बाब अधोरेखितही होते ....!

परवा पेब फोर्ट वर जो अपघात झाला त्यात एका अरुंद उतारावर एक मुलगी घसरली अन तिला वाचवायला गेलेला तरुणही घसरला .... अन रेस्क्यू टीमला बोलवावे लागले .... रेस्क्यू करणाऱ्यांनाही किती त्रास देणार तुम्ही ..... !

पण थोडीशी काळजी घेतली असती तर या घटनेतील पुढील भाग नक्कीच टाळता आला असता ....!

तुम्ही ग्रुप घेऊन जाता तर स्वतः बरोबर दोर का नाही घेऊन जात ?

आपल्या इथे गिर्यारोहणासाठीचे दोर सहज उपलब्ध आहेत.

कितीही सोप्पे गिर्यारोहण असले तरी १०० फुटांचा एक तरी दोर घेऊन जा .... पावसाळ्यात पेब फोर्ट सारख्या ठिकाणे १०० फुटांचे दोन दोर न्या की .... दोर कॅरी करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ....!

परवा त्या ग्रुप कडे दोर असता तर त्या मुलीला वर घेता आले असते की ... अन जो दुसरा मुलगा घसरला तो घसरला नसता की .... दोर असला की काहीतरी मार्ग काढता येतो .....!

पाच सहा वर्षांपूर्वी मी पावसाळ्यातच पेब फोर्टला गेलो होतो .... भरपूर गर्दी होती .... त्यात एक चार जणांचा असाच कुठल्यातरी गावातला खाजगी ग्रुप पिकनिकला म्हणून आला होता ..... आजकाल पिकनिक म्हणूनही बरेचजण अशा ठिकाणी येत असतात .... अन त्यातील एकजण दरीत साठ सत्तर फूट घसरला ..... अंगाला खरचटले होते ..... घाबरून रडत होता .... हा प्रसंग घडल्यानंतर साधारण वीसेक मिनिटात मी तिथे पोहोचलो असेन .... कसली बोंबाबोंब चाललीय म्हणून जमलेल्या मुलांना विचारले तर त्यांनी खाली दरीत पडलेल्या मुलाकडे बोट दाखविले ..... म्हटले सर्वांनी आता मागे व्हा अन त्याला तुमचे बहुमूल्य advise द्यायचे थांबवा. नाहीतर त्याला आणखीन खड्ड्यात घालाल ....!

मी माझ्या सॅक मधला १०० फुटांचा दोर काढला अन पुढे जे काय करायचे ते केले ....!

जो पडला होता त्याच्या कमरेला दोर बांधताना माझ्या लक्षात आले की भाऊ भरपूर प्यालेला आहे ..... आता काय बोलावे कळेना .... मी त्याच्या कमरेला बांधलेला दोर परत सोडला व दोराला धरून दूर जाऊ लागलो तेव्हा तो "अहो मला सोडून कुठे चाललात" म्हणत परत ओरडायला लागला .... म्हटले तू दारू पिऊन आला आहेस म्हणून मी तुला नाही वाचवणार .... जाम घाबरला ..... म्हटले दारू प्यायची ती घरीच काय ती पी .... इथे कशाला आलास दारू पिऊन .... मेला असतास की .... आईवडिलांची शपथ घेऊन सांग की मी यापुढे दारू पिणार नाही ...!

भाऊने शपथ तर घेतली खरी, पण चेहऱ्याकडे बघितल्यावर किती दिवस शपथ टिकेल शंकाच होती ....!

सांगायचे तात्पर्य, गरज नसतानाही दोर कॅरी करायची सवय लावा .... तुमच्या नाही पण दुसऱ्या ग्रुपमधील कोणाला तरी त्याचा उपयोग होईल अन आहे तिथे विषय संपेल अन गिर्यारोहणाची होणारी बदनामी थांबेल ....!

तुमच्याकडे दोर नसेल तर मी देतो तुम्हाला असेच .... ट्रेक झाल्यावर मात्र आठवणीने परत आणून द्या ..... मला ९८६९४७४३४३ वर किंवा Suraj Malusare ९२२१८३१३६४ वर संपर्क साधा .... पण यापुढे साध्या ट्रेकलाही मजा म्हणून दोर कॅरी करायची सवय लावा भाऊ .....!
original link
https://www.facebook.com/arunpsawant/posts/10159144651280554

Comments

Popular posts from this blog

Places to avoid trekking during rains in maharashtra by Team ॥महाराष्ट्र देशा॥

पावसाने चांगलाच जोर धरला असल्यामुळे प्रत्येकाने पावसात चिंब भिजण्यासाठी, मनसोक्त डुंबण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा विचार केला असेल. जाण्यापुर्वी आपण खालील ठिकाणावर जात नाहीत आहोत ना ह्याची खात्री करून घ्या. खालील ठिकाणे हे पावसाळ्यात करण्यायोग्य नाही आहेत. एकाएकी पावसाचा जोर वाढल्यास ओढे नदीनाले भरून वाहू लागतात आणि अशावेळी अपघात होण्याची शक्यता आहे.

खालील ठिकाणी जाताना तुम्हाला कमीतकमी एक तरी ओढा ओलांडावाच लागणार आहे. त्यामुळे काळजी घेतलेली चांगली.

तसेच तटबंदीवर, कड्यावर किंवा धबधब्यात सेल्फी घेण्याच्या प्रयत्न करू नका. सेल्फीच्या वेडापायी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

भटकंती करताना घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे हे ध्यानात ठेवा. तसेच आपण कुठे आणि कोणाबरोबर जात आहोत ह्याची कल्पना घरात देऊन ठेवा.

Team ॥महाराष्ट्र देशा॥

फोटो सौजन्य - सह्याद्री मित्र WhatsApp group
https://www.facebook.com/desha.maharashtra/posts/694641804079524
https://www.facebook.com/desha.maharashtra/

sahyadri maharashtra Trekking spots with heavy crowd july 2018

Due to extremely heavy crowd and life threatening safety issues at following places, Travorbis will not be arranging following treks till mid-September.
1. Kalsubai
2. Andharban
3. Devkund
4. Harihar
5. Peb
6. Lohgad
7. Kalavantin durg
8. Gorakhgad
9. Rajmachi
10. Raigad

https://www.facebook.com/Travorbis/photos/a.243349196162157.1073741828.237519983411745/398794443950964/?type=3&theater

news paper clippings on safety issues in maharashtra trekking july 2017

No more walking ‘green mile’ for Pune trekkers: Safety top priority as accidents spike
PUNE Updated: Aug 20, 2017 16:28 IST
nullah in Tamhini ghat Two trekkers still missing
 Tamhini valley and Maan taluka,n Bhira dam area,hills located at Pimpri village
TOi TNN | Jul 24, 2017, 12:22 AM IST
waterfall near Gidhad Lake in Lonavla accident 21st july 
waterfall near Tiger Point 
Mumbai trekker slips into a 15-ft ditch under waterfall in Lonavala, dies
hindustantimes.com/ Updated: Jul 21, 2017 10:10 IST
According to Raigad and Navi Mumbai police, 16 people have died and more than 50 have received injuries at various waterfalls and hilly areas around Mumbai during this monsoon.


mahuli accident 2017
After 2 deaths in Lonavla, Thane bans trekking at Mahuli, Tansa and Bhatsa till Sept  hindustantimes.com Jul 23, 2017 01:52 IST

2 tourists die as they imitate the ‘Baahubali jump’ at Mahuli waterfall; police to bar tourists’ entry.
 Mumbai Mirror | Updated: Jul 20, 2017, 07.26 AM IST

Madhe ghat accident 17.07…