20 trekkers stuck at harishchandragad while rappeling 25.11.2018 Safe/rescued

----------------------------

Arun Sawant
November 28 at 4:26 PM
फेसबुक वरील माझ्या प्रिय गिर्यारोहक मित्रांनो .... !

दोन दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडावरील कोकण कडा येथे झालेल्या रॅपलिंग कॅम्पमध्ये निर्माण झालेल्या अडचणी व त्या अडचणीतून सर्व गिर्यारोहकांची सहीसलामत झालेली सुटका याबद्दल माझ्या कानावर बरेच काही आले .... तसेच फेसबुक वरूनही होत असलेले आरोप प्रत्यारोप वाचनात आले ....!

म्हटलं जे जे कोणी यात involve होते त्यांचेशी प्रत्यक्ष फोन करून सत्य परिस्थिती जाणून घ्यावी व आपले मत मांडावे ... म्हणून मी त्या रॅपलिंग कॅम्पचा आयोजक राज पालकर, अनिल वाघ, गणेश गिद, निवृत्ती मुठे यांचेशी फोनवर सविस्तर बोललो व अथपासून इथपर्यंत पूर्ण माहिती घेतली .... !

केवळ गैरसमजातून म्हणा की हेतुपुरस्सर माहीत नाही ... पण बऱ्याच चुकीच्या बातम्या मीडियातून प्रसारित झाल्या अन सर्वच महाराष्ट्राचे व खास करून आपल्या गिर्यारोहकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले .... पण त्यामुळे आपले गिर्यारोहण जगत बदनाम झाले एवढे नक्की ....!

त्यानंतरही अनेक जणांनी फेसबुक वर आपापली मते मांडली .... त्यात गैर काहीच नाही .... पण ती अर्धवट माहितीवर आधारित आहे हे मी इथे ठामपणे नमूद करू इच्छितो ...!

आपण यात कोणाचे काय बरोबर होते व कोणाचे काय चुकले यावर नंतर चर्चा करूया .... पण माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आता हा विषय ताबडतोब थांबवा व ज्यांनी ज्यांनी या घटनेसंबंधी पोस्ट टाकल्या असतील त्या सर्वांनी त्या ताबडतोब डिलिट करून टाकाव्यात .... कारण इथे एका व्यक्तीच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे .... !

कोकण कड्यावर 18 गिर्यारोहक अडकले .... गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ला .... दोन गिर्यारोहक दरीत पडून मृत्यू आदी भयानक बातम्या सारख्या सारख्या tv वर येत राहिल्या व त्या ऐकून वरील कॅपचा आयोजक राज पालकर याच्या आईला जबर धक्का बसला व तिला तात्काळ हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागले....!

मित्रांनो .... थांबवा आता ही भांडणे अन हे एकमेकांवर आरोप करणे ... त्यामुळे बरेच जण यात भरडले जात आहेत ... आम्ही पण पूर्वी बरेच रेस्क्यू केले आहेत पण असे कोणाचे उणेदुणे काढलेले मला तरी आठवत नाही .... अन अशा भांडणात कशाला बिचाऱ्या माऊलीला मनस्ताप देताय ... अरे त्या जागी तुमची आई असती तर तुम्हाला काय वाटले असते ... थोडा तरी विचार करा .... बस्स झाले आता हे सगळे ...!

अरे या विचित्र मीडियामुळे अन तुमच्यामुळे त्या १२ instructors च्या घरच्यांनाच नव्हे तर नातेवाईकांनाही मनस्ताप होतोय याची तुम्हाला जाणीव आहे का .... त्यांचे गिर्यारोहणच तुम्ही कायमचे बंद करून टाकीत आहात .... माझी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती आहे की या विषयावरील सर्वच्या सर्व पोस्ट ताबडतोब डिलिट करून टाका ... अन हा विषय इथेच थांबवा ... !

अन कोणीही कोणाची कुठेही तक्रार करायची गरज नाहीय ... अरे कशाला त्या बिचाऱ्या आईवडिलांना अजून त्रास देताय ...!

अरुण सावंत
मुंबई दिनांक २८ नोव्हेंबर २०१८
---------------------------------------------------------------------
http://zeenews.india.com/marathi/video/murbad-trackers-rescued-late-night-from-harishchandra-gad-trackers-angry-for-no-proper-managment/452503
-----------------------------



*हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यातील थरार*.
कल्याणचे हितेश आडवाणी यांच्याबरोबर 20 ट्रेकर्स गडावर आले, नियोजित रँपलीग चा कार्यक्रम होता, पण नियोजन व्यवस्थित नव्हते, साहित्य कमी होते, तांत्रिक दृष्टीने काही गोष्टी कडे दुर्लक्ष केलेले होते. 
कोकणकड्यात अशा तोकड्या ज्ञानाने असे धाडस करणे म्हणजे विस एकवीस लोकांच्या जिवाशी खेळ होता हा. कोणत्याही प्रकारची रेस्क्यू साठी यंत्रणा यांनी विचारात पण घेतली नव्हती.
सेट अप लावताना सेट अप चूकला व सेट अप लावणारा निघून गेला. मदतीसाठी दुसरा तज्ञ पुढे आला तो सेट अप लाऊन निघून गेला. म्हणजे मृत्यूचे सापळेच लावून लोकांना मरणाच्या खाईत (दरीत ) सोडून दिले जात होते.
रँपलीग सुरु झाले सगळे सहभागी सदस्य 800 फुट उतरल्यावर सर्व एकसाथ खाली अजून 1000 फुट उतरणार होते. पण पहिल्या टप्प्यात उशीर झाला रात्र झाली, वरुन रोप काढून घेण्यात आले. आता त्यांना जेवणाची पाण्याची व्यवस्था स्वतः च बंद केली होती. आजच सर्व घरी पोचणारी लोकं दरीत अडकून पडली. 
यांच्या कडे बँटरी टाँर्च नाही, झोपायला कपडे नाही, जेवणाची सोय नाही, प्यायला पाणी नाही. रात्रीची वेळ कड्यावर फुरसे, मण्यार सारखे अत्यंत विषारी निशाचर सापाचा वावर आहे, विंचू, इंगळ्या, यामुळे नको ते विचार त्यांच्या डोक्यात येत होते. 
यांना उशीर झाल्यावर मदतीसाठी नातेवाईक काँल करु लागले. आम्ही सुरवातीला जायला नको अशा विचारात होतो. कारण आमच्या माहितीनुसार कोणी चुकलेले नाही, कोणत्याही प्रकारचा अपघात नाही, फक्त उतरायला उशीर झाला आहे. रात्री मुक्काम करून सकाळी उतरतील स्वतः अशी चर्चा आमच्या टीममध्ये झाली. पण नंतर कल्याण तहसीलदार श्री. अमित सानप साहेब यांचा रेस्क्यू साठी काँल आला.व बाहेरून माहिती मिळाली की टेक्निकल स्टाँंग कोणी टीम मध्ये नाही, नियोजन फसलेले आहे. मग टेक्निकल टिम पाठवू असे ठरले.
गणेश गिद च्या नेतृत्वाखाली शिवदुर्ग मित्र लोणावळाची टिम निघाली . कोणीही जाऊन चालणार नव्हते. त्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी 1150 फुट क्लाईंब करुन जावे लागणार होते. साहित्य घेऊन छोटी टिम निघाली बँक अप ला बाकी टिम तयारीतच होतो. नाशिकच्या वैनत्येय ग्रुपचा फोन आला. व दयानंद कोळी सर व त्यांचे चार सहकारी पण निघाले.
मध्यरात्री बैलपाडा गावात दोन्ही टिम पोचल्या व पहाटेच शोध बचाव मोहीम सूरु केली पहिले तिन तास जंगलात चालायचे मग चढाई करत करत अडकलेल्या पर्यटकापर्यत पोचले. साहित्य कमी पडत होते. त्यांच्या रोपची दुर्दशा झालेली होती. खुपच वाईट अवस्था होती.500 फुटाचे रँपलीग व शेवटी 300 फुटाचे रँपलीगचे टप्पे पार करत संध्याकाळी 5.00 वाजता सर्व मंडळी जंगलात पोचली , गणेश गिद, सुरेश दादा गिद यांनी वाईड अप करुन गावाकडे परत चालत निघाले. 7.30 ला सर्व लोक सुखरूप बाहेर पडले.
शिवदुर्ग मित्र, लोणावळा व वैनत्येय अँडव्हेंचर नाशिक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
मुरबाड निवासी नायब तहसीलदार हनुमंत जगताप साहेब यांनी सुखरूप सुटका झालेल्या टेकर्सची जेवणाची सोय केली . व शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा व वैनत्येय अँडव्हेंचर नाशिक यांचे कौतुक करून सन्मान केला .
रेस्क्यू सफल झाला.









They were going to rappel in the night ganesh from shivadurg advised them not to do that time he told to stay and rescue team will come next day. then in the  morning they started to rappel down but just 2 or 3 people went down till that time rescue team climbed up then all came down with help of rescue team  -- via  discussion with rohit vartak
Organizers ला आणि टेक्निकल सपोर्ट कोणाचा होता त्यंना तर बघितलं पहिजेच पण यामध्ये participents ची देखिल चुक आहे. आज आपण होटेल मध्ये जाताना reviews बघतो, नवीन फोन घेतांना 10 लोकांना विचारतो मग जिकडे जिवाला धोका आहे तिकडे जाताना का नही verify करत? कुठला ग्रुप आहे? अनुभव? मेडिकल आणि rescue back-up?

#kokankada #rescue 26/11/2018






शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla
 Ganesh Geedh
https://www.facebook.com/roovartak
https://www.facebook.com/ganesh.geedh.9

discussions on the event
1) November 28 at 8:07 AM
November 28 at 4:26 PM
https://www.facebook.com/savita.kirat/posts/1889513061097639----------------------------------------------------------------------------------- update 26.11.2018

update 1
Shivdurga Mitra and Vainateya team are on their way 

The victim group has reached to safe place where they can spend the night. They will start rappelling tomorrow.


Will keep posted


-- update shared by onkar oak

(DO NOT CALL RESCUE NUMBERS AND DISTURB THE RESCUE OPERATION!)


शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla - Home ...

Vainateya Giryarohan Giribhraman


update 2


Rescue teams have reached to Kokankada base camp from where actual climbing starts.

Both the team's are together.

Victim team has started rappelling down. Rescue team has started climbing and both the groups will meet on the way

-- update shared by onkar oak


Organizers ला आणि टेक्निकल सपोर्ट कोणाचा होता त्यंना तर बघितलं पहिजेच पण यामध्ये participents ची देखिल चुक आहे. आज आपण होटेल मध्ये जाताना reviews बघतो, नवीन फोन घेतांना 10 लोकांना विचारतो मग जिकडे जिवाला धोका आहे तिकडे जाताना का नही verify करत? कुठला ग्रुप आहे? अनुभव? मेडिकल आणि rescue back-up?
#kokankada #rescue 26/11/2018  --- 

Rohit Vartak 


"KonkanKada Rappelling" Stop Following Rumors.. no casualties no missing all participants are safe
''हरिश्चंद्रगड कोकणकडा ट्रेकर्स सुरक्षित "
दि.२५/११/१८ रोजी मुंबई व औरंगाबाद येथील ट्रकर्स हे ट्रॅकिंग व रॅपलिंग साठी हरिश्चंद्रगड या ठिकाणी आले होते .हरिश्चंद्र येथील स्थानिक गाईड निवृत्ती हा कोकण कडा ते बेलपाडा रॅपलिंग करीत असतांना मधमाशांच्या मोहळ ला त्यांच्या पायाचा धक्का लागला त्यामुळे टँकर्स यांना सेटअप चेन्ज करण्यास उशीर झाला .दोन टीम यांनी संयुक्तीक रॅपलिंग करण्यात सुरुवात केली .१२ पुरुष व ०४ महिला रॅपलिंग करीत १००० मीटर खाली गेल्यानंतर अंधार झाल्याने व काही दिसत नसल्याने ते त्याच ठिकाणी थांबून असून ते सुरक्षित त्या ठिकाणी आहेत .राज पारकर व अस्लम भाई मोतीवाला हे अनुभवी ग्रुप लीडर देखील त्यांच्यासोबत आहेत . सदर लोंकाना रोप द्वारे अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे .दिवस उजाडताच ते पुढील मोहीम पूर्ण करणार आहेत .तसेच कोकणकड्यावर उर्वरीत थांबलेले ट्रेकर्स यांना पायथ्याशी आणलेले आहेत .कुणीही ट्रॅकर्स हे अडकलेले नसून सर्व सुरक्षित आहेत .अफवांवर विश्वास ठेवू नये .
(पी.वाय.कादरी)
सहा.पोलीस निरीक्षक 
राजुर पोलीस ठाणे

-- share by Sushant Kamble 

हरिश्चंद्रगडः मृत्यूच्या दाढेतून ट्रेकर्सना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू
http://marathi.eenaduindia.com/State/Ahmadnagar/2018/11/26132102/rescue-operation-going-on-for-Kalyan-trekkers-at-Harishchandragad.vpf?fbclid=IwAR2wRhd665j2nIlOjhTLQgl0upL1JR-2MZnBRN6KcFbaIMVW0846chpWXWY


Dr Hitesh Advani and 16 other trekkers reached the ground 24 hours after they began their trek on Sunday.

At 10 am on Sunday, they had started their trek from Harishchandragad with a group of 22 people. "On the evening of 22nd, five people returned and 17 of us continued to trek to Konkankada," says Advani, a dentist from Ulhasnagar.  


DrHitesh Advani

https://www.dnaindia.com/mumbai/report-17-trekkers-rescued-from-harishchandragadh-2689690



ट्रैकर्स कल्याण और उसके आसपास के इलाकों से हैं 
सभी एक सेफ प्लेस पर रुके हुए थे 
Dainik Bhaskar
Nov 26, 2018, 02:25 PM IST
पुणे. ठाणे के मुम्ब्रा में स्थित हरिश्चंद्रगढ़ पर रविवार रात से फंसे सभी 22 ट्रैकर्स को सोमवार दोपहर सही सलामत नीचे उतार लिया गया है। ये रास्ता भटक कर फंस गए थे। स्थानीय लोगों और पुलिस की राहत टीम के सहयोग से सही सलामत नीचे उतारा गया है।




एक टीम सोमवार सुबह से उन्हें नीचे उतारने के प्रयास में लग गई थी। ट्रैकिंग के लिए गई 22 लोगों की टीम लौटते वक्त रास्ता भटक गई और पूरी रात पहाड़ी पर फंसी रही। इस टीम में से दो-तीन एक्सपर्ट ट्रैकर्स हैं इसके बावजूद ये रास्ता खोजने में कामयाब नहीं रहे। ज्यादातर ट्रैकर्स कल्याण और आसपास के इलाके से हैं।



जिलाधिकारी राजेश नार्वेकर ने बताया- "इसी ग्रुप में से एक डॉ हितेश अडवाणी ने हमें इसकी जानकारी दी और हमने रात से ही इन्हें रेस्क्यू का प्रयास शुरू कर दिया। फिलहाल सभी सुरक्षित हैं और एक प्लेन जगह पर रुके हुए हैं। इनके पास पानी, खाना और सोने का पूरा सामान है। यही नहीं ठंड से बचने के लिए इन्होंने रात में कुछ लकड़ियां भी जमा कर ली थीं। कैम्प फायर की आग से ही हमारी टीम को यहां पहुंचने में आसानी हुई। कुछ ही देर में सभी को सही सलामत नीचे उतार लिया जाएगा।"


एनडीआरएफ भी थी अलर्ट : पुणे की राष्ट्रीय आपदा प्रबंधन दल की टीम को भी अलर्ट किया गया। लेकिन उन्हें वहां नहीं भेजा गया। एनडीआरएफ के उप कमांडेंट सचिदानंद गावड़े ने कहा, "हमने ट्रेकर्स से बात की वे सभी सुरक्षित हैं। उन्हें एक गाड़ी की जरुरत है। इसलिए हमने एक टीम नहीं भेजी। 



मुम्बई पुलिस के मुताबिक, ट्रेकर्स ने हरिश्चचंद्रगढ़ के दूसरी तरफ अपना वाहन छोड़ा और नीचे उतारते वक्त फंस गए। एक पुलिस अधिकारी ने बताया कि स्थानीय लोगों को भी रात में उनकी मदद के लिए कहा गया था।




1424 मीटर की ऊंचाई पर स्थित है यह किला : मालशेज घाट में 1424 मीटर की ऊंचाई पर स्थित हरिश्चंद्रगढ़ किला ट्रैकिंग के लिए फेमस है। इसे छठीं शताब्दी में बनाया गया था। इसके पास ही हरिश्चंद्रगढ़ चोटी एक प्रमुख पर्यटन स्थल है। 
https://www.bhaskar.com/maharashtra/pune/news/maharashtra-22-trekkers-lose-way-and-stuck-on-harishchandragad-01336298.html

https://www.facebook.com/events/259495141501164/

https://www.facebook.com/we.trekers/
 https://www.facebook.com/Adventuresquad.in/
https://www.facebook.com/nivrutti.nivrutti.501

November 25, 2018 11:56 pm

https://www.loksatta.com/maharashtra-news/20-trekkers-from-kalyan-stucked-in-harishchandragad-1795136/

हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेलेले कल्याणचे 20 जण अडकले आहेत. कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलिसांना यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका कशी होईल ते पाहण्यास सांगितले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व ट्रेकर्स सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. ट्रेकर्सकडे १५ भाकरी, पाणी आणि ऊबदार कपडे असून त्यांनी शेकोटीही पेटवल्याची खात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यातील डॉ. हितेश अडवाणी आणि काही जणच व्यावसायिक ट्रेकर्स आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते.  त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला असून हे सर्व कोकणकडापासून खाली 1000 फूट अंतरावर आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. अंधार पडल्याने सध्या तरी कोकणकडा येथे या अडकलेल्या 20 ट्रेकर्सना रात्र काढावी लागणार आहे. जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. याशिवाय ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी देखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.


google translate below 

20 people from Kalyan who have gone for trekking in Harishchandragad are stuck. All trekkers are stuck at 1000 feet below Konkankada. Attempts are being made to save these trekkers from the NDRF. District Collector Rajesh Narvekar has asked Kalyan Tehsildar and the police to coordinate this and asked to see how the trekkers will be rescued. Meanwhile, District Collector Rajesh Narvekar said that all the trekers are safe. Trekkers have 15 pieces of bread, water and warm clothes and they have ensured fireworks by revenue department officials. Dr. Hitesh Advani and some are the only business trekkers. The District Magistrate has clarified that they are in touch with us.

According to the information, Kalyan Dr. Hitesh Advani, along with 20 people, went to Harishchandragad for trekking. They have 5 women and 17 men. Dr. Advani has been contacted and is all about 1000 feet away from Konkan. Being dark they do not find the way. Therefore, the rescue team has been asked to send their exact location. District Collector has also informed Thane rural police and Junnar police about this incident and Tehsildar Amit Sanap is keeping an eye on the campaign. At present, there will be 20 tracts of this stuck in the night at Konkankada due to darkness. The district administration is constantly in contact with the city and district administration to increase the tremendous trekkers. Besides, some trekers are being taken from Thane too. Murbad tehsildars and their employees are also trying to save.


MH-TREKKERS PTI November 25, 2018 22:52 IST
Group of trekkers stuck near Harishchandragad
    Thane (Maha), Nov 25 (PTI) A group of 22 trekkers
is stuck at Harishchandragad near Murbad in Thane district of
Maharashtra, officials said late Sunday evening.
    A team of the National Disaster Response Force
has been called for rescue, the district administration said.
    The trekkers are from Kalyan in the district and are
believed to be near Kokan Kada, around 1.5 km from
Harishchandragad which is a popular trekking spot in Sahyadri.
    District Collector Rajesh Narvekar is monitoring the
situation, officials said. PTI CORR

KRK KRK

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023