Woman slipped at visapur fort rescued by Shivdurg Rescue Team 30.8.2025
नमस्कार
आज विसापूर किल्ल्यावर एका महिलाचा पाय घसरून पडल्या होत्या त्याचा गुडघ्यातून ट्यूस्ट झाला होता चालता येत नव्हते. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने रेस्कू ॲापरेशन राबवले व सटर महिलेस स्केड स्ट्रेचर वरुन विसापूर किल्ल्यावरुन खाली घेऊन आले
आजची रेस्कु अॅापरेशन टिन मेंबर
https://www.instagram.com/reel/DOI-paGDK_n/?igsh=YW92YXNmdm8wa3Vv
रोहित नगीने
राहुल शिवाजी दारकुंडे
सिध्दांत मु़गसे
सर्व्हेश भुसाटे
आकाश नागमुरकर
तुषार घिगे
महेश मसने
योगेश दळवी
सचिन गायकवाड सर
योगेश उंबरे
हर्षल चौधरी
प्रिन्स बैठा
सागर कुंभार
सागर दळवी
आनंद शिर्के
आदिती गायकवाड
रोहित गायकवाड
सुनिल गायकवाड
-- via gopal johri
Hello
Today, a woman slipped and fell at Visapur Fort, her knee was twisted and she could not walk. Shivdurg Rescue Team conducted a rescue operation and brought the woman down from Visapur Fort on a stretcher.
Today's rescue operation tin member
Rohit Nagine
Rahul Shivaji Darkunde
Siddhant Mugse
Sarvesh Bhusate
Akash Nagmurkar
Tushar Ghige
Mahesh Masne
Yogesh Dalvi
Sachin Gaikwad Sir
Yogesh Umbre
Harshal Chaudhary
Prince Baitha
Sagar Kumbhar
Sagar Dalvi
Anand Shirke
Aditi Gaikwad
Rohit Gaikwad
Sunil Gaikwad
विसापुर अपघात बचाव कार्य दिनांक 31/08/2025 सकाळी 10.40 ला फोन आला विसापूर किल्ल्यावर एका महिलेचा पाय मुरगळला आहे व चालता येत नाही. पुरातत्व खात्याचे कर्मचारी तात्काळ त्या महिलेजवळ पोचले व परीस्थीतीचा अंदाज घेतला व रेस्कु टिमची गरजच आहे असे सांगितलं उचलून आणायला लागणार आहे.
ग्रुपवर मेसेज टाकला टिमची जुळवाजुळव करुन शिवदुर्ग टिम विसापूर कडे निघाली. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे साहेब यांनीही पोलीस कर्मचारी तात्काळ मदतीसाठी रवाना केले.
रविवारी थोडीफार गर्दी असतेच ती पार करून लोहगड विसापूरच्या मधील गाय खिडींतुन विसापूर कडे गाडी घेऊन गेलो. व झटपट पण काळजी घेत शेवाळलेल्या दगडावरुन विसापूर ला वर गेलो. मुबंईवरुन परीवारासह आलेल्या सौ कल्पना परमार यांचा पाय दुखावलेला दिसत होता थोडी सुज वाटत होती. पण त्या खंबीर होत्या लाकडाच्या पट्ट्या लावून क्रेप बँन्डेडने लपेटून घेतल्या. स्ट्रेचर उघडले रोप मोकळा केला. सौ परमार बसल्या होत्या तिथेच शेजारी स्ट्रेचर ठेवले मँडमनी स्वतः शिफ्टींग करुन स्ट्रेचर वर आल्या. पेंटासेफ लाइफ गिअर कंपनीचे स्ट्रेचर अशा वेळी चांगले उपयोगी येते. व्यवस्थित बांधून घेतले उजव्या पायाला फ्रँक्चर होते. डाव्या पायाच्या खाली थोडी पँकींग लावली उतारावर जखमी पायावर लोड येऊ नये म्हणून काळजी घेतली होती . हळु हळु स्ट्रेचर मार्गी लावले. आता उतार व मोठ मोठे दगड गोटे व पावसाने शेवाळलेले होते. चिकट झालेले होते. पावसाचे पाणी यामधून जोरात खळखळत वाहत होते त्यामुळे प्रत्येक पाऊल प्रत्येक जण जपून टाकत होता. व पेशंटला थोडाही धक्का लागू नये त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत होते. उतार असल्यामुळे मागचे सदस्य पुढे पुढे जाऊन स्ट्रेचर पकडत होते. पाठीमागून रोपने हळुहळू खाली सोडत होते.किल्ला फिरायला आलेल्या मुळचे अहिल्यानगर व नोकरी चाकण चे पाच कार्यकर्ते आमच्या मदतीला धावले व मदत कार्य करु लागले. पोलीस कर्मचारी त्या अपघातग्रस्त महिलेला उचलायला आमच्या बरोबरीने साथ देत होते. सर्व नव्या दमाचे तरुण असल्यामुळे भरपूर जोश दिसत होता. एका पोलीस भावाचा पाय घसरला पण लगेचच सावरला. व पुढील वाटचाल चालू झाली. पेशंटला थोड्या थोड्या वेळाने काही त्रास तर होत नाही ना? अशी चौकशी सदस्य करीत होते.
सर्व अडचणीत मार्ग काढत अथक परीश्रमाणे पेशंट अँम्बुलन्स मध्ये शिफ्ट केला. पायथ्याशी पोचेपर्यत साधारणत: अडीच तासात सर्व आँपरेशन संपले होते. कार्ला येथील दवाखान्यात प्रथमोपचार करून पेशंट मुंबई कडे पाठवले.
Comments
Post a Comment