Harihar Fort banned 01.07.2019

Permission can be taken at the base of the fort(harshewadi or nirgudpada) with entry fee of 10 rs n count limited to 30 people

बंदीच्या पार्श्वभूमीवर वैनतेयने केलेल्या विनंतीला मा. जिल्हाधिकार्‍यांनी मान दिल्याबद्दल त्यांचे खुप...खुप...आभार...

अनावश्यक गर्दी होते अशा गडांवर ही मात्रा उपयोगी ठरू शकेल असे वाटते...

सुरक्षित गिरीभ्रमणासाठी हे महत्वांचेच

हरिहर गडावर जायचंय, परवानगी घ्या!
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 02 Jul 2019, 07:28 AM

हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने
पश्चिम वनविभागाचा नियम; पर्यटकांची होणार तपासणी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने परवानगीशिवाय कोणालाही गडावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असून, पर्यटकांच्या गर्दीचे चोख नियंत्रण केले जाणार आहे.
नाशिक पश्चिम वनविभागातर्फे हरिहरगडाच्या पायथ्याशी 'प्रवेश निषिद्ध' असे फलक लावण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर पर्यटकांच्या गर्दीने मोठी कोंडी झाली होती. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर पश्चिम वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी किल्ल्याच्या परिसराची पाहणी करण्याचे आदेश परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. यानुसार परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी राखीव वन क्षेत्रात येणाऱ्या किल्ल्याच्या परिसराची पाहणी केली. पाहणीअंती पर्यटकांना विनापरवानगी गडावर जाता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
वनविभाग, पोलिस, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने हरिहरगड येथे वन व्यवस्थापन समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे संपूर्ण लक्ष गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह ट्रेकर्सवर असले. गडाच्या पायथ्याशी सर्वांची तपासणी केली जाईल. परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच गडावर जाता येईल. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, या शुल्कातून गडसंवर्धनाचे कार्य पुढील टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. यामुळे हरिहरगडावर जायचं झाल्यास आता पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसह वन क्षेत्राचे रक्षण होईल, असा विश्वास वन खात्याने व्यक्त केला आहे.
हरिहरगड येथे हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची तक्रारी होत्या. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता गडावर जाण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. तसेच पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ट्रेकिंग किंवा पर्यटनासाठी जाता येणार नाही.
- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक
पावसाळ्यात हरिहरगडावर ट्रेकर्स व पर्यटकांची गर्दी अधिक असते. या काळात गडावर सुरक्षेची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. वनविभागाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून या कार्यवाहीत सातत्य राहिले पाहिजे.
- संजय अमृतकर, ट्रेकर
http://mtonline.in/3EPZCb?dga  via @mataonline: http://app.mtmobile.in

पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी... हा निर्णय खूप लोकांना खुपणारा आहे परंतु सुरक्षेच्या मानाने अगदी योग्य निर्णय म्हणता येईल, मागच्या दोन आठवड्यात जी गर्दी हरिहर वर झाली होती ती खरच चिंतेचा विषय होती. सुदैवाने काही अपघात झाले नाहीत परंतु एवढी गर्दी बघून खरच किल्ल्याचा पण श्वास गुदमरला असेल हे नक्की...
आजकाल ट्रेकिंग फक्त आवड राहिलेली नसून ती ट्रेंड झालीये, काही लोक फक्त पावसाळ्यातच ट्रेक करतात. यात काही वयक्तिक ग्रुप असतात जे मोजक्या माणसांचे असतात आणि काही commercial ग्रुप सुद्धा असतात जे खूप लोकांचा ग्रुप घेऊन जातात अश्या वेळी या पावसाळी ट्रेकर्सच्या सुरक्षेची काळजी कोण घेत ?
आणि किल्ल्यावर आणि परिसरात होणाऱ्या कचऱ्याची गोष्ट तर बाजूलाच राहते.

हरिहर सारखा अवघड किल्ला उन्हाळ्यात चढण मुश्किल असत आणि पावसाळ्यात एवढी गर्दी तिथे जाते आणि दुर्दैवाने एखादा अपघात झालाच तर याला जवाबदार कोण तर आपण प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे!
हे खरंच थांबायला हवं . ट्रेक करू नका अस माझं मत नाहीये पण ट्रेकच्या नावाखाली जत्रा भरवू नका.
.
.
एक निसर्गप्रेमी या नात्याने माझा वनविभागाच्या या निर्णयाला समर्थन 🙏
https://www.facebook.com/526792088151456/photos/a.528055038025161/599107464253251/

हरिहरगडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसावा. तसेच पर्यटकांची सुरक्षा राखली जावी. म्हणून पश्चिम वनविभागाने परवानगीशिवाय कोणालाही गडावर प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच पर्यटकांना गडावर जाता येणार आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असून, पर्यटकांच्या गर्दीचे चोख नियंत्रण केले जाणार आहे. 
नाशिक पश्चिम वनविभागातर्फे हरिहरगडाच्या पायथ्याशी 'प्रवेश निषिद्ध' असे फलक लावण्यात आले आहे. गेल्या आ‌ठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर पर्यटकांच्या गर्दीने मोठी कोंडी झाली होती. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर पश्चिम वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी किल्ल्याच्या परिसराची पाहणी करण्याचे आदेश परिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. यानुसार परिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी राखीव वन क्षेत्रात येणाऱ्या किल्ल्याच्या परिसराची पाहणी केली. पाहणीअंती पर्यटकांना विनापरवानगी गडावर जाता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 
वनविभाग, पोलिस, ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने हरिहरगड येथे वन व्यवस्थापन समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे संपूर्ण लक्ष गडावर जाणाऱ्या पर्यटकांसह ट्रेकर्सवर असले. गडाच्या पायथ्याशी सर्वांची तपासणी केली जाईल. परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच गडावर जाता येईल. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, या शुल्कातून गडसंवर्धनाचे कार्य पुढील टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. यामुळे हरिहरगडावर जायचं झाल्यास आता पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसह वन क्षेत्राचे रक्षण होईल, असा विश्वास वन खात्याने व्यक्त केला आहे. 

हरिहरगड येथे हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची तक्रारी होत्या. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेकरिता गडावर जाण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. तसेच पर्यटकांना परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ट्रेकिंग किंवा पर्यटनासाठी जाता येणार नाही. 

- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक 

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/visit-harihar-fort-get-permission/articleshow/70029220.cms

सह्याद्रीतील किल्ल्यांवर पर्यटकांची ‘बेभान’ गर्दी
Guidelines for all the departments have been issued under the disaster relief for the growing crowd on the Harihar fort. Instructions have also been issued to the forest officials. A solution will be drawn to this situation with the help of local machinery and locals in the growing crowd. Legal process is also being considered.
-Suraj Mandhr, District Collector, Nashik
https://www.loksatta.com/mumbai-news/tourists-crowds-on-sahyadri-fort-trekking-abn-97-1919858/

Tourists banned from going to Harihar fort in rainy season ... This decision is very good for many people, but with safety, the right decision can be said that the crowd that had gone up to Harihar in the last two weeks was a matter of real concern. Today, there have been no accidents, but seeing such a crowd, the fort of the fort will suffocated. Surely, trekking nowadays is not only a favorite, but it has trends, some people just trek out in the monsoon. There are also commercial groups, which take a lot of time, who take care of the safety of these rainy trekkers, there are some individual groups which are of fewer people and some commercial and the waste of the waste and the area is left aside. Difficult to climb the difficult fort, like Harihar, where the crowd goes there and unfortunately, if an accident occurs, then who is responsible for it, you can show it to the administration with a finger! It really should stop. Do not trek, I do not think so, but do not fill the bags in the name of Trek. Supporting this decision of my forest department as a naturalist

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023