Various views on safety

#शिडी_रे_शिडी_कैसी_जगेपे_खडी

तर मित्रहो; आजचा विषय आहे गडकिल्यांवर अवघड जागी लावल्या जाणार्या शिड्या सद्ध्या चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. नेहेमीप्रमाणे वेगवेगळ्या गटातटात #शिडी ही trend follow करून pro आणि cons चर्चिले जात आहेत. ह्या विषयावर सरसकटीकरण न करता साधकबाधक चर्चा होणे गरजेचे. मुळात ह्या शिडीकडे बघण्याचा सह्याद्रीत फिरणार्या प्रत्येकाचा दृष्टीकोन प्रथम लक्षात घेऊया. कसा आहे आणि कसा असावा याबाबत माझी मते मांडतो. अर्थात मतांतरे असतीलच. वेगवेगळे पैलू अभ्यासूया.

weekend warrior किंवा हौशी ट्रेकर :

हा प्राणी स्वांतसुखाय भटकंती करत असतो. ह्यामध्ये अगदी उथळ, सवंग selfie / insta छाप भटक्यापासून ते पोटापुरता अभ्यास करून गडकिल्ले, निसर्ग अनुभवणारा दर्दी माणसापर्यंत प्रजाती आढळतात. साधारणपणे ह्याची policy making मध्ये धांदलीने काही सहभाग नसेल पण Go with the flow अशी attitude असते. ह्याची risk taking ची desire आणि ability ही सर्वस्वी त्याची किंवा त्याच्या लहानश्या group ची जवाबदारी असते. फार adoptive अशी pedigree असते ही. शिड्या असो नसो ह्यांना फरक पडणार नाही पण ह्या जमातीपासूनच सुरवात करून मी evolve झालो असल्याने उत्क्रांतीवादाच्या नियमानुसार सह्याद्रीत trekking हे गडकिल्ले , इतिहास आणि eco system ला bypass करून करताच येणार नाही हे जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले.

इतिहास/निसर्गअभ्यासक आणि दुर्ग संशोधक : ही एक super speciality branch ज्यांच्या सजग नजरेने आणि अथक अभ्यासाने सह्याद्रीतील trekking ची प्रत जपली गेली आहे. नाहीतर अख्ख्या सह्याद्रीचे माथेरान महाबळेश्वर करून tourism आणि five star service industry बनली असती.. अगदी कुलू मनाली डलहौसी कसोली सारखी. ही मंडळी आपण जो किल्ला एका दिवसात बघतो त्याला हे लोक अख्खा आठवडा घालवूनही संतुष्ट नसतात. दुर्गावशेषांनी संपन्न अश्या महाराष्ट्रातील दुर्गांचा अभ्यास करायला आणि हे वैभव राखायला ह्यांचे मार्गदर्शन गरजेचे. ह्यात बरीच जुनी दर्दी निस्पृह मंडळी आहेत ज्यांचे thrill seeking पेक्षा चार लोकांना गड दाखवणे हे धोरण असल्यामुळे अवघड जागी शिड्या लाऊन गडाची accessibility वाढवणे ह्यांच्या पथ्थ्यावर पडते. ही लोकंं योग्य ठिकाणी शिडी लावण्याला सहसा विरोध करणार नाहीत.

दुर्गसंवर्धक/संस्था : सह्याद्री trekking ह्या परिसंस्थेतील हे मावळे किंवा foot soldiers ज्याच्या backbreaking physical labour मुळे बरेच गड आज जागते आहेत आणि बरेच पडझड झालेले , दुर्लक्षित अवशेष मोकळा श्वास घेत आहेत. बिचारे भावनिक असतात. इतिहास आणि महाराजांवरील वेड्या प्रेमापोटी दुर्गसंवर्धनाच्या brown field project वर प्रसंगी पदरमोड करून राब राब राबतात. बरेचदा योग्य तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण नसल्यामुळे लोकांच्या शिव्याही खातात. संवर्धन करणार्या संस्थाच्या आपासातील चुरशीमुळे trend ही follow करतात. उदाहरणार्थ टाक्या तर टाक्या.., दरवाजे तर दरवाजे , तोफगाडे तर तोफगाडे... आणि आता शिड्या. पण मित्रांनो हे विसरून चालणार नाही हे सर्व करण्यासाठी लागणारे कष्ट आणि संसाधने हे मावळे उभे करतात म्हणून तर किल्ला आपल्याला कुठेतरी किल्ल्यासारखा दिसतो. पटत नसेल तर कुठल्याही परप्रांतीयाला विशेषतः राजस्थानकडील माणसाला एखादा आडवाटेवरचा दुर्लक्षित किल्ला दाखवायला घेऊन जा. तो म्हणेल किधर खंढहर दिखाने लाया. तेव्हा आपल्यासारख्या कुंपणावर बसणार्यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा त्यांचे हात बळकट कसे होतील ह्यावर भाष्य करा. दुर्गसंवर्धन करणार्या संस्थांनीही एक common shared portal / platform वरून कामाच्या technical draft ठरवून फक्त आणि फक्त तांत्रिक गरजेनुसार भावनिक न होता दुर्गसंवर्धन करावे जेणेकडून संसाधने आणि मनस्ताप दोन्ही वाचेल. आता वेगळे सांगायला नको की शिड्या लावणारे हात आणि पैसा हा बहुतांश ह्यांचाच असतो.

adventure geek : हे साधारण किल्ल्याकडे एक physical आणि psychological challenge म्हणून बघतात. एकेकाळी मीही असा होतो किंबहुना अजूनही थोडा बहूत आहे. येथे किल्ला असण्यापेक्षा त्याची difficulty level, height, rock patches, traverse आणि scree patches चा track ठेवला जातो. त्यातही चुकीचे काही नाही. विदेशातलं बरच trekking असंच होतं. पण ही लोकं सहसा छोट्या समूहात किंवा solo भटकणारी आणि हळूहळू किल्ल्याकडून सुळकेगिरी कडे सरकतात. आता तर सह्याद्रीत sky diving पर्यंतची आव्हाने उभी राहात असल्यामुळे कुठलाही डोंगर आपलासा करू शकणारी ही मंडळी कधी कुठल्या शिडीकरता उर बडवून घेताना दिसणार नाहीत.

.....पोष्ट थोडी लांबतेय... ;-) तेव्हा दीर्घ श्वास घेऊन मी नमुद करू इच्छितो की वर नमुद केलेल्या भटक्यांच्या जाती प्रजातीमध्ये आणि गुणधर्मात बराच कर्मसंकर झालेला आजकाल दिसू शकतो जसे दुर्गसंवर्धक hardcore trek करतात.. किंवा selfie वाले hard core climbing करू शकतात आणि गडावर न जाताही गडकिल्ल्यांवर पुस्तके येऊ शकतात. पण त्यातही genuine आणि fake मालातला फरक कळून येतो हो.

गडरहाळातील स्थनिक : ज्या ज्या भटक्यांना गडकिल्ला ही एक परिपूर्ण eco system म्हणून बघायची सवय असेल ते स्थानिकांना कसं विसरतील? पण हेच policy making मध्ये बरेचदा डावालले जातात. बरेचदा गडाच्या पंचक्रोशीतील देव गडावर असतात. त्याला नारळ कोंबा द्यायचा असतो. काही गडकिल्ले इतके दुर्गम असतात की आपल्यासारख्या तिथं xxx कपाळात जातील पण ही लोकं तिथ लिलया लटकत फिरतात. पण जर त्यांच्या रहदारीचा आणि दळणवळणाचा प्रश्न असेल तर ते आपल्या परीने मार्ग सुकर करतीलच की. त्यांनाही पोरबाळं आहेत ना ? गडावरचा footfall वाढला आणि त्यांनी चार पैसे जोडले तर तुमची का जळते? तुम्ही lifetime मध्ये एकदा गडावर येणार आणि नंतर घरी जाऊन पहिला माळा चढताना lift शोधणार आणि वर गडावरच्या शिड्यांना बोल लावणार? ये बात कुछ हजम नही हुई सरकार.

आतापर्यंत discuss झालेल्या सगळ्या जाती प्रजातीकडून गडकिल्ल्याकरता आणि trekking करता लक्षणीय योगदान पूर्वपरंपरागत मिळत आलेलं आहे आणि मिळत राहील. पण अलिकडच्या दोन तीन दशकात system मध्ये पैसा आल्यापासून ह्या जमातींमध्ये genetic mutation झालं आहे. पैसा शेवटी वाईटच हो..,जिथं काही वर्षापूर्वी फक्त YZ लोकं भटकायची तिथं अचानक decathlon crowd गर्दी करतोय. अगदी दुर्गसंवर्धनातही चढाओढ, इर्षा आणि स्पर्धा वाढलेली दिसतेय. थोडक्यात काय तर ship of commerce has sailed into सह्याद्री . period .

आणि म्हणूनच अचानक शिडी लावावी की न लावावी ह्यावर वाद सुरू झालेत. शिडीविरोधात बोलणारे प्रामुख्याने दोन मुद्दे पुढे करतात.

१. गडावर होणारी गर्दी
२. Safety किंवा सुरक्षा

पहिल्या मुद्द्यावर मी एवढंच बोलीन भारताची लोकसंख्या ज्याप्रकारे वाढतेय त्याप्रकारे trekkers ची गर्दीही वाढणारच ना? Jokes apart; पण कलावंतीणच्या सुळक्याला कुठे शिडी नाहीय.. पण तिथं गर्दी आहे. आणि मोरगिरीला शिडी आहे पण तिथं काळं कुत्रही फिरकत नाही. You do the maths आणि मला सांगा की गर्दीचा आणि अपघाताचा संबध popularity index शी जास्त असतो की accessibility शी.

आणि ह्या अनुषंगाने मी गर्दीविरोधात कांगावा करणार्यांना हेही विचारेन की तुमचा हेतू किती स्वच्छ आहे. तुम्हाला खरंच गर्दी नकोय ती गडकिल्ल्यांची/eco system काळजी आहे म्हणून की तुम्हाला तुमचे, तुमच्या कंपूचे/clients चे exclusivity rights आणि privacy maintain करायची आहे म्हणून ह्यावर आत्मपरिक्षण करा.

बाकी दुसरा मुद्दा , सुरक्षेचा म्हणाल तर जगभरातील popular आणि कठीण trek route हे via ferratta झाले आहेत. तिथं pegs, bolts, chains, wire ropes, scaffolds/ artificial ledges, अगदी hanging bridge वगैरे अशी permanent features आहेत. ती maintain आणि operate बहुतांश स्थानिकांकडून होतात. ( सोबत फोटो जोडत आहे ) म्हणून इथही निव्वळ शिडीला विरोधाकरता विरोध करण्यापेक्षा ते infrastructure , resources आणि training स्थानिकांना द्या. खरंतर कालचं कुठतरी मी म्हणलं की जिथं सुरतेत पोर भाजून मरताना fire dept वाल्यांकडे शिड्या नव्हत्या तिथं डोंगरात शिडी लागतेय ही एक welcome quantum leap आहे. आपली अक्कल आणि क्रयशक्ती प्रबोधन आणि प्रशिक्षणावर खर्चूया. तुमचा trek lead करण्याचा elite शहरी attitude सोडा आणि योग्य दिशेने कामाला लागा. गर्दीचा त्रास तरीही होत असेल तर नवीन जागा नवीन route शोधा. आणि तरिही गर्दीला विरोध करायचा असेल तर स्वतःपासून सुरवात करा. उदाहरण म्हणून सांगतो की मी रायगडावर कधीही राजाभिषेक, जयंती, पुण्यतिथी वा कुठही सोहळ्याला जात नाही. गर्दीचे किल्ले फक्त odd day ला जातो. आणि हरिहरचा event लावायच्या घाईत नाहीय. इथं कुठं शिडीही नाहीय. ;-)

ह्याच उलट दुर्गसंवर्धकांनाही मी कळकळीने सांगेन की मेहनत तुमची, पैसा तुम्ही उभा करणार तो नीट feasibility study करून करा. गरज आणि सुरेक्षेची उपाययोजना म्हणून करा. आपण कितीही भावनिक झालो तरी गडकिल्ले हे शिवकाळाऐवढे आणि सारखेही राबते होणार नाहीत आणि तसे न होण्यातच त्यांचा मान आणि रुदबा आहे. तद्न्यांकडून मार्गदर्शन घ्या. जमल्यास शिडीचा basic pattern समन्वयाने ठरवा जो safety / costing / maintenance ह्या सर्व parameters खरा उतरेल. शक्य असेल तिथे ही काम स्थानिकांना delegate करा. तुम्ही supervision ठेवा. शक्य असल्यास bolt /wire rope / chains वापरा.. Rock face आणि किल्ल्याचे मुळ structure ला हानी पोहचवू नका.

आणि बरच काही.. पण इथं सर्वच समजूतदार आहेत.
आपण सगळे घेणेदार आहोत तेव्हा काय द्यायचं ह्याचा विचार करा.

( सोबत काही फोटो जोडत आहे.., बाकी शिडी शिडी होती है.. सबको अपने अपने मुकाम पहुचाती है इसालिये जरूरी होती है. )

Vivek Patil
June 23 at 1:26 PM
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1284611128381536&id=100004979827803

ट्रेक गृप आणि दोन्ही बाजूनी होणाऱ्या प्रचाराच्या निमित्ताने...
हे फोटो बघून थक्क व्हायला होतं... अगदी आत्ता आत्ता 10 वर्षांपूर्वी पर्यंत ह्या गडांवर हातावर मोजण्या एवढी मंडळी असायची... मी अस म्हणत नाहीये आणि खरच अस नाहीये की प्रत्येक शनिवारी रविवारी अशीच आणि एवढीच गर्दी असेल... पण जेव्हा होत असेल तेव्हा त्यावर नियंत्रण करण फार कठीण आहे... वर्षभरात 2 ते3 वेळा जास्तीत जास्त अशी गर्दी होत असेल ... पण अप प्रचार करणारे अस दाखवतात की जणू वर्षातल्या 52 आठवडे अशी गर्दी व्हायला लागली आहे... वस्तुस्थिती अशी नाही ... वर्षातून कधीतरी एकदा अस होणे म्हणजे ट्रेक नेणारे सगळे बेजबाबदार अस म्हणणं चूक आहे... बरेच समूह आता whatsapp वर संपर्क साधून एकमेकांचे कार्यक्रम बघूनच आपल्या तारखा निश्चित करतात पण काहीवेळा अचानक काही समूहाचे कार्यक्रम ठरतात जे जुन्या समूहांच्या यादीतच नसतात आणि मग अशी गर्दी होते... सध्या सगळ्या गडांवर हीच परिस्थिती आहे पण ह्या फोटोंमधील गर्दी म्हणजे आपण अस म्हणू की त्या गडावरील देवाची जत्राच आहे... ठरवून केलेली नाही पण अचानक अनावधानाने झालेली... पण म्हणून सगळे ट्रेक गृप आणि त्यांचे आयोजक दोषी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे.. त्या आयोजकांमधील प्रमुखाला गिर्यारोहण आणि होणाऱ्या अपघातांची आणि अश्या परिस्थितीला सामोरे जन्य एवढा अनुभव हवा हे नक्की... पण ह्याची जबाबदारी सरकारने स्थानिक लोकांना द्यायला हवी... की आधी रजिस्ट्रेशन करा पायथ्याच्या गावात 8 दिवस आधी आणि संख्या सांगा त्यानुसार परवानगी द्यावी... मी आजपर्यंत हे बघितलं आहे की एखादी बातमी करायची आणि बोंब मारत सुटायचे.. पण त्यातून आपल्या अनुभवाने काय मार्ग काढता येईल हे कोणीच कुठेच सांगत नाही... मग होत काय लोक पोस्ट वाचतात आणि सोडून देतात...मला माझ्या अनुभवाप्रमाणे काही उपाय सुचले आहेत ते नमूद करत आहे...
1 ) गडाखालील गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील ह्याकडे गृप च्या नावाने नोंदणी करावी.
2 ) गृप ची संख्या सांगावी
3 ) ह्या संख्येला एक मर्यादा ठेवायचे काम सरपंच किंवा पाटील ह्यांनी करावे.
4 ) संख्या जास्त झाल्यास त्यांना पुढील तारीख त्यांनीच द्यावी .
5 ) सांगितलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्या आणल्यास काटेकोरपणे सांगून जास्त लोकांना खालीच बसवावे. एकदा अस केलं की परत कोणी जास्त संख्या आणणार नाही.
6 ) आजूबाजूच्या गडांचीही माहिती द्यावी, उदा. हरिहरच्या बाजूला भास्करगड, भांडार दुर्ग, अंजनेरी असे पर्याय द्यावे.
7 ) संख्या किती आहे त्यानुसार सामग्री आहे का? कमीत कमी 30 मीटरचा रोप ,2-3 हारनेस सेट. प्रथमोपचार पेटी इत्यादी बंधनकारक करावे.
8 ) असे अनेक गड-किल्ले आहेत जे चर्चेत नाहीत म्हणून तिथे गर्दी होत नाही ,महाराष्ट्रात कमीतकमी 100 किल्ले सुस्थितीत आहेत प्रत्येक गडावर 2 गृप धरले तरी चांगली संख्या नेणारे 200 गृप वेगवेगळ्या गडांवर गेले तरी गर्दी होणार नाही...
9 ) सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमी खर्चात नेऊन जास्त फायदा कामावण्यापेक्षा जास्त फी ठेऊन मर्यादित लोक घेऊन जावे... आणि ह्या फी मधील काही भाग स्थानिक लोकांमधील निवडलेले 3-4 लोकांना तिथली सुरक्षा तिथले म्हणजे गडावरील नियम पालन करून घेण्यासाठी द्यावा अगदी पावती घेऊन द्यावा पण आपल्या सुरक्षेसाठी द्यावा म्हणजे स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि सुरक्षितता जपली जाईल..
अजूनही काही मुद्दे अनुभवी लोक सांगू शकतील पण त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा नवख्या लोकांना करून द्यावा.कारण पब मध्ये जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालणारे लोक ते सगळं सोडून सह्याद्रीत सह्याद्रीचे नियम पाळून तो आनंद लुटत असतील तर हा एक विधायक बदल घडत आहे ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही... ©सुबोध वैशंपायन
Subodh Vaishampayan
June 24 at 6:45 PM ·
https://www.facebook.com/sumuvai/posts/2815968595142293


पावसाळा सुरू होतो न होतो सगळी कडे 'ट्रेकर' तयार होतील आणि 'फेसबुक' आणि 'इन्स्टाग्राम' चे फॉलोअर वाढवण्याच्या तयारीत लागतील. मागच्या वर्षीपासून ही हवा खूपच वाढत चालली आहे. नक्कीच सहयाद्री आपला सगळ्यांचा आहे आणि तो जेवढा सुंदर आहे त्याची काळजी आपल्यालाच घ्यायांची आहे. एक गोष्ट लक्षात नेहेमी ठेवावी तो जेवढा सुंदर आहे तेवढाच कणखर पण. त्याच्यावर जाऊन उत्मात केलात तर त्याच रुद्र रूप सुद्धा दाखवेल आणि ह्याच रूपाने एखादा दारू पिऊन दरीत पडेल किव्हा पाय घसरून जीव गमवेल तेव्हा सहयाद्री ला दोष दिला जाईल आणि ज्याचं खरच ह्या गडांवर प्रेम आहे त्याला गडावर जाता येणार नाही.
दारू, गांजा ह्या सगळ्या गोष्टी आता खूप प्रमाणात लोकांना गडावर सापडायला लागल्यात ह्याचा राग तर येतोच पण वाईट ही वाटते की आपल्याला एवढी ही अक्कल नसावी? सगळ्याच गडांवर मंदिर आहेत आणि आपण हे सगळं मंदिरात जाऊन करतो आहोत.
काही गोष्टी ह्या ट्रेक लीडरने लक्ष देऊन केल्या तर बराच त्रास कमी होईल (निसर्गाला). गडावर गर्दी वाढून नक्कीच गावातील लोकांना उत्पन्न मिळत पण ते इतके शिकलेले नाहीत की त्यांना ह्या गर्दी ची दुसरी बाजू कळेल. बहुतेक वेळा त्यांना ह्या गर्दीचा त्रासच होतो.
जर एवढ्या संख्येनं 'ट्रेकर' गडांवर जात असतील तर नक्कीच खूप चांगल्या गोष्टी करता येतील.

* निदान दोन ओळीं तरी त्या गडबद्दल वाचुन गड चढा
* स्वतः केलेला कचरा (प्लॅस्टिक) निदान गडावर सोडू नका
* गावकार्यना त्रास देऊ नका
* गडावरच पाणी खराब करू नका
* नवीन येणारी झाड तोडू नाका. नवीन झाड लावा
* दारू, गांजा, सिगरेट असल्या गोष्टी करू नका
* गावातील मुलांना वह्या पुस्तक द्या
* गावातील प्लास्टिक खाली आणा
* गडावर शिस्तीने वागा. एकमेकांना वाट द्या
*उरलेलं खाणं गावातील मुलांना द्या
* स्वतःच ताट वाटी घरातून घेऊन जा (ह्याने प्लास्टिक प्लेट कमी वापरली जाईल)
* पाण्याच्या टाक्यात कचरा टाकू नका
* बुरुज, तटबंदी ची दगड पाडू नाका

निसर्गाची काळजी घेणे हे आपलंच काम आहे.

जय शिवराय!!!

- संकेत नाईक

Sanket Naik
June 25 at 10:37 PM
https://www.facebook.com/sanket.naik.520/posts/2544333428924647

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023