Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019

Beware of Bees at Kothhalgad Kothaligad (peth) 5th June 2019
Kothaligad is a small Fort is situated to the east of Karjat near Karjat-Murbad Road in the Indian state of Maharashtra. map 
https://en.wikipedia.org/wiki/Kothaligad
Not all Superheros wear capes, पण आमचा सुपरहिरो नेहमी OWLET ची कॅप घालतो, ...हो सुपरहीरोच !!

काल आमचा कोथळीगड चा ट्रेक होता, संपूर्ण गड बघून झाल्यावर गडाच्या पाठीमागील बाजूस काही पाण्याचे टाके आहेत, जिथे नॉर्मली 'जत्रा' लोकं जात नाहीत, ते टाके पाहण्यासाठी अर्ध्या ग्रुपला घेऊन मी गडाच्या मागील बाजूस गेलो, तिथे मधमाश्या घोंगावत होत्या त्यावरून अंदाज आला कि जवळच कुठेतरी मधाचं पोळं असेल आणि कुणीतरी आधीच करून ठेवलेल्या मस्तीमुळे इथे आपल्या ग्रुपला धोका होऊ शकतो, आम्ही वेळीच तिथून काढता पाय घेतला, पण सोबत काही ६ ते १२ वयोगटातील लहान मुलं होती, अशा परिस्थितीचा नक्कीच त्यांना कधी अनुभव नव्हता आणि त्यांनी कसे वागावे कसे वागू नये याची तुम्ही अपेक्षा देखील करणे चुकीचे आहे , सर्वाना पटकन हात पकडून उतरवायला सुरवात केली तेव्हा एक दोन जणांच्या कानाजवळ माशा घोंगवायला लागल्या, त्या मुलांनी पॅनिक होऊन थोडा आवाज आणि पळापळ केली त्या मुळे आपल्या ग्रुपवर मधमाशांचा हल्ला झाला,
हो बरोबर वाचताय तुम्ही आपल्या ग्रुपवर काल मधमाशांनी हल्ला केला, जमेल तितक्या लोकांना जमेल तेवढ्या लवकर मी, ज्योती, पंकज, आणि समीर दादा पटापट खाली उतरवत होतो, पण मधमाशांनी आपला मोर्चा सर्वात लहान असणाऱ्या वैष्णवी कडे वळवला, उतारावरून तिचा हाथ पकडून तिला खाली उतरवणे शक्य नव्हते, ती जोरात ओरडायला आणि रडायला लागली तेव्हा माशा जास्तच चवताळल्या, पण समीर दादाने तिला वाचवण्यासाठी कवटाळून धरून ठेवले परिणामी त्या सर्व माशा त्याला चावल्या, ज्योतीने त्या मुलीला कसेतरी माझ्याकडे दिले आणि मी तिला पाठीवर टाकून पटकन खाली उतरलो, पंकजने देखील बाकीच्या लहान मुलांना हात पकडून खाली उतरवले, त्या माशा आमच्या दिशेने येऊ नये म्हणून समीर दादा दोन्ही हाथ स्वतःच्या चेहऱ्याभोवती गुंडाळून तिथेच बसून राहिला, खाली आल्यावर त्याचे डोके, कान, मान आणि हात मिळून ५० च्या वर मधमाशांचे डंख काढण्यात आले,

जे काही झालं खूप वाईट झालं पण एका मोठ्या वाईट प्रसंगातून आम्ही सर्व बचावलो, सर्वजण आता ठीक आहेत, ३-४ जण सोडले तर कुणाला काही जास्त इजा झाली नाही, ती लहान वैष्णवी पण आता ठीक आहे, आपला सुपरहिरो समीर दादा आता मेडिसिन वरती आहे पण ठीक आहे, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सुपरहिरोचा आज बड्डे आहे,
इतके होऊन देखील त्या नंतर सर्व परिस्थिती त्याने पॅनिक न होता हसऱ्या चेहऱ्याने हाताळली, तेव्हा तुम्ही देखील टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका, तर्कवितर्क लावू नका, आपल्या एक्सपर्ट कमेंट देऊ नका, चर्चा भरवू नका, आपल्या हिरोला फक्त भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या
आणि त्याला फोन करून सगळी स्टोरी विचारू नका, त्याला आजचा दिवस अराम करू द्या, बाकी काही प्रश्न असतील तर मी, पंकज आणि ज्योती ताई आहेच ;)

वाढदिसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा Sameer Patel सर, नेहमी हसत रहा, मस्त जगा, आहेत तसेच रहा, लवकरच परत भेटून पार्टी करूया 😘😍😍
https://www.facebook.com/photo.php?fbid=2420616244655411&set=a.162559773794414&type=3

Comments

Popular posts from this blog

unfortunate incident at Harishchandragad 1st August 2023 report by harishchgandragad guide balu

Engineering student from Malegaon slips and dies at salhar fort at balgan 16th July 2022