सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार

# सह्याद्रीत फिरताना पाळावयाचा अलिखित करार#

       आपण सगळी सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात फिरणारी स्वच्छंदी माणसं. इथं कोण किल्ले पाहण्यासाठी, कोण लेणी पाहाण्यासाठी, कोण जंगले अनुभवण्यासाठी, कोण त्यातील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी फिरत असतो. शक्यतो हा पायी करावा लागणारा प्रवास आपण कधी गरज पडली तर रात्रीही करतो. वर ऊल्लेख केलेल्या सर्व गोष्टी म्हणजे निसर्गाचाच एक भाग. येथे कोणी अभ्यासासाठी फिरतो तर कोणी आनंदाचा एक भाग म्हणून सहज फिरतो.
               सह्याद्रीतील या फिरण्याला कोणताही असा नियम नाही. पण जेवण करताना चूल पेटवली तर ती पूर्णपणे विझवावी,प्लॅस्टीक कचरा वाटेत टाकू नये, जलसाठ्यांचा योग्य वापर करावा अशा काही गोष्टी सर्वांणीच मान्य केलेल्या व कुणालाही या गोष्टींचे महत्व ही कळते.
             आता या सर्वानुमते मान्य ठरणार्‍या गोष्टी. आता काही अलिखित सह्याद्रीत फिरताना सहसा कुणाच्या लक्षात न येणार्‍या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आपण बर्‍याचदा ट्रेकची माहिती काढून एखादा ट्रेक करायला जातो. चाल चाल चालतो. खूप चालल्यावर वाट चुकली हे लक्षात येते. योग्य वाटेचा शोध सुरू होतो अन् अचानक आपण मनात न योजलेल्या ठिकाणी पोहोचतो. समोर एखादी कपार, वरून कोसळणारा रम्य धबधबा, त्याच्या पायथ्याला गूढरम्य डोह असं सगळं कोणीही मंत्रमुग्ध होऊन जावावा असे वातावरण. ती जागा आडबाजूला असल्याने  ना तिथे स्थानिकांचा वावर असतो ना आपल्या सारख्या ट्रेकर्सचा.  तिथले अदभुत रम्य वातावरण आपणास अक्षरशः काही क्षण जगाचा विसर पाडायला भाग पाडतं. आपण भारावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणचे फोटो काढतो व परत मार्ग शोधण्यासाठी माघारी वळतो. कुणाला बोलावं असं वाटतं नाही, ओरडावे असे वाटतं नाही, कुणाला खाण्यापिण्याची शुध्द ही रहात नाही. जणू त्या अज्ञात ठिकाणाची भुली आपणास सगळं विसरावयास भाग पाडते. पुढे योजलेल्या ठिकाणी आपण पोहोचतो. ट्रेक सुफळ होतो. सर्वजण आपापल्या घरी परततात.
           आता काय होतं बघा! ट्रेक लीडर जर सुजाण नसेल तर त्या ग्रुपमधील एखादा मेंबर फेसबुकला केलेल्या ट्रेकची पोस्ट टाकतो. त्यात ते अज्ञात ठिकाण जरा सुस्पष्ट करून सांगितले जाते. फोटो टाकले जातात. झालं, त्या मेंबरला लगेच फोन येतात व तो आपल्या मुळ ट्रेक लीडरला न विचारता आपल्या नवीन मित्र मैत्रिणींना तेथे धडपडत घेऊन जातो, तेथे एक ग्रुप, दोन ग्रूप करत लोकांची रीघ लागते. अज्ञात ठिकाणाचि फार विचका होतो. सगळी शांतता भंग पावते. स्वर्गसुख देणारे ते ठिकाण आता कचर्‍याने, गोंधळाने भेसूर वाटायला लागते.
        असेच अनेकदा सह्याद्रीत फिरत असताना आपण अनेक सुंदर अशा गोष्टी बघतो. कुणाला गडावर अचानक बिबट्या सामोरा येतो. तो हरवून जातो. लगेच परत आल्यावर कुठल्या किल्ल्यावर, कुठे, कसा, कुठल्या वेळेला बिबट्या दिसला. तो तेथे नेहमी येतो का हेही सांगितले जाते. जणू त्या बिबट्याचे त्या भागात वावरायचे वेळापत्रकच फेबु वरून जाहीर होते. मग काय, हवसे गवसे, नवशे अशांची टीमच तेथे वेळी अवेळी दाखल होते. शांततेचा भंग होतो. तेथे रूळलेला बिबट्या तेथून निघून जातो. जणू त्या गडावरचे सृष्टीचक्रच थांबते.
             अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील, मांडता येतील. आपल्याला  ट्रेकवर दिसलेली प्रत्येक गोष्ट अन् गोष्ट  प्रसारमाध्यमांवर मांडायची काही गरज नाही. प्रत्येक गोष्टीचा फोटोच घेतला पाहिजे, त्याची जाहीर वाच्यताच केली पाहिजे, याची गरज नाही मित्रांनो. कधीतरी अचानक नजरे समोर आलेल्या निसर्ग सुखाचा नजरेने आनंद घ्या. ते सुख डोळ्यांमार्फत ह्यदयापर्यंत पोहचू द्या. प्रत्येक गोष्टीचा फोटो, प्रत्येक पाहिलेल्या गोष्टीची पोस्ट गरजेची नाही. काही अज्ञात गोष्टी अज्ञातच राहू द्या. काही गोष्टींचा आनंद स्वतः अनुभवा, मित्रांशी बोलताना ठिकाणाचे नाव न सांगता हे हे बघितले म्हणून शेअर करा. न जाणो, ऊद्या ज्या गडावर तुम्ही वाघ बघितला, त्या ठिकाणी पोस्ट व्हायरल होऊन एखादा शिकारी पोहोचला व त्याने आपला दावा साधला तर काय करायचे. तेव्हा परत एकदा कळकळीने सांगतो सह्याद्रीत फिरताना पाहिलेले सगळे सार्वजनिक चव्हाट्यावर मांडू नका. आपल्या सह्याद्रीशी केलेला अलिखित करार पाळा. ( ता.क. मला माहितेय हे सगळे हाताबाहेर गेले आहे पण "ऊम्मीद पे जहाँ टिका है।" या न्यायाने हे मांडतोय.
          आपला नम्र — भगवान चिले.

 Unwritten agreement #

       All of us are in the bedroom of Sahyadri. To see forts in which to see the caves, to see the caves, who to experience the forests, who are studying the life of their life. It is possible that this is a journey that we have ever needed, even when we need it at night. All the above mentioned things are a part of nature. If someone walks around for study, then one can easily walk as a part of happiness.
               There is no such rule in this area of ​​Sahyadri. But if the food is cooked, then it should be completely discontinued, plastics should not be put in the garbage, all the things used for proper use of the reservoirs, and everyone recognizes the importance of these things.
             Now the things that are recognized by this proponent. Now, in some unscriptural companions, I will show you some unimportant things. Most of the time, you have to track a track and track it. Moves on. It turns out that it was too late to walk. Finding the right path and suddenly we reach the place that is not planned. In front of a cloak, a romantic waterfall collapsing from above, the embodiment of the embryo at its base, such an enchanting body, such an enchantment should be made. Because the place is adjoining, there is no locality in it, nor does the tracker like you. The supernatural atmosphere here lets you forget the world in virtually a few moments. You draw the photo of the place in the shape of the place and return to find the way back. Nobody thinks to call someone, it does not feel like crying, nor does anyone have the right to food. Forgetting the unknown place you forget about yourself. We move forward to the planned place. The trek is successful. Everyone goes back home.
           See what happens now! If a Trek Leader is not aware, then a member of that group posts a trace made by Facebook. It is said that the unknown place is clearly made by it. Photos are dropped. When the call comes to the member immediately, he does not ask his native trek leader to take his new friends to the clutter, where there is a group, two groups having groups of people. The unknown place is very disturbed. All peace was dissolved. The place that dwells in heaven, starts to feel tired and confused.
        In the same way, we often look at many beautiful things while traveling in Sahyadri. Someone suddenly comes face to face with a leopard. He is lost On the fort, once again, a leopard appeared on a fort, where, how, and at what time. It is also said that it always comes there. It is as if they were announced from FB in the area where the leopard started. Then there, the team of Navy, Navy and Awas Gaya were unarmed there. Peace breaks. There the rugged leopard goes out. Just like that, the creature of the castle stops.
             There are many such things that can be told and ready. There is no need to mention everything you see on Trek on the media. It does not need to be photographed every single thing, it should be publicly read, friends. Enjoy some kind of natural beauty that suddenly appears in front of you. Let them reach the heart through happiness eyes. The photo of everything, not every post seen is needed. Keep some unknown things anonymously. Enjoy some things, experience yourself, share it with friends, and do not tell the name of the place without looking at it. Do not know, if you see a tiger on the highway, the post is viral and what a hunter finds and what to do if you claim it. Do not bother again once again on all public views seen in Sahyadri. Follow the unwritten agreement with your partner. (T.K. I know all this has gone out of hand, but "where is the hinges on the ocean." This is the reason of this judgment.
          Your humble - Lord Chile.

Comments

Popular posts from this blog

tourist without guide or proper trekking gear dies due to dense fog at Harishchandragad

rescue at Dhak Bahiri Sunday 1st October 2023