Shivdurga Mitra Rescue in the mountains near Kaivalyadham lonavala 29.01.2023
On 29/01/2023 in the afternoon, a phone call was received from Sitaram Dubal Saheb, Police Inspector, Lonavla City. A person has lost his way in the mountains near Kaivalyadham.
Two policemen have already gone to search.
We asked for the phone number of the lost person but it was of no use. It was the number in the region. It was closed and required emergency calls only.
Then the policeman Mahadev Mhetre Saheb was in the search operation and after taking his location, the Shivdurg team left for the search operation.
I went near Kaivalyadham school with all the materials. According to the information provided by the security guards, three foreigners had gone for a walk to the mountains and two of them have returned and one Marathi speaking gentleman has not returned.
It was a regular mountain of information. A team of ten people left. The Bakuli garden above brought back childhood memories and started the quest. I went to the cave along the path leading to the cave and started checking if anyone had slipped down there as there was a steep slope down there.
According to the information received from the police, it was thought that there was no accident. They are safe only the road does not notice.
Rajendra Kale, senior means 70 years of age, he was a gentleman.
If they are good then they will respond to our voice so we started making noise and uncle responded softly to the first sound.
They could be on the mountain slope below the cave and they were moving forward as they responded. But below that is the garden of Tata company. There was a dilemma as security guards could also respond.
Vishwas Rao Saheb, Manager of Tata Company was informed about the incident and asked to send security guards towards us.
We were shouting loudly and uncle heard it and finally responded with a loud shout.
When Tim reached them, he was in a panicked state. After giving them water and some sweets to eat, they held their hands and brought them back to Kaivalyadham safely.
Police Inspector Sitaram Dubal Saheb and Police Sub-Inspector Sandesh Bavkar Saheb had reached the spot by then.
He praised Tim.
Today's team
Rajendra Kadu, Mahesh Masane, Yogesh Umbre, Yogesh Dalvi, Amar Thacker, Rajesh Thacker, Amit Balakwade, Rahul Durge, Amol Sutar, Sunil Gaikwad
https://www.facebook.com/watch/?v=1920903804929025
दिनांक 29/01/2023 रोजी दुपारी लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सिताराम डुबल साहेब यांचा फोन आला. कैवल्यधाम जवळच्या डोंगरावर एक व्यक्ती वाट चुकली आहे.
दोन पोलिस कर्मचारी शोध घेण्यासाठी आधीच गेले आहेत.
आम्ही रस्ता चुकलेल्या व्यक्तीचा फोन नंबर मागितला पण त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. तो प्रदेशातील नंबर होता. तो बंद होता त्यावरुन फक्त आणि फक्त इमरजन्सी कॉल लागत होता.
मग पोलिस कर्मचारी महादेव म्हेत्रे साहेब हे शोधकार्यात होते त्यांचे लोकेशन घेऊन शिवदुर्गची टिम शोधकार्यासाठी निघालो.
सर्व साहित्य बरोबर घेऊन कैवल्यधाम शाळेजवळ गेलो. सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन परदेशी व्यक्ती डोंगराकडे फिरायला गेले होते व त्यापैकी दोन जण परत आलेले आहेत व एक मराठी बोलणारे गृहस्थ परत आलेले नाही .
तसा नियमीत माहितीचा असलेला डोंगर होता हा. दहा जणांची टिम निघाली. वर असलेली बकुळीची बागेने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला व शोधकार्य चालू केले. गुहेकडे जाणारी पायवाटेने गुहेकडे गेलो व तिथेच खाली तिव्र उतार असल्याने त्याभागात खाली कोणी घसरले की काय ते तपासू लागलो .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा अपघात झालेला नाही हे वाटत होते. ते सुरक्षित आहेत फक्त रस्ता लक्षात येत नाही.
राजेंद्र काळे , वयस्कर म्हणजे वय वर्षे 70 चे ते गृहस्थ होते.
ते जर व्यवस्थित आहेत तर ते आपल्या आवाजाला प्रतिसाद देतील म्हणून आम्ही आवाज द्यायला सुरुवात केली व पहिल्यांच आवाजाला काकांनी हलका प्रतिसाद दिला.
गुहेच्या खाली डोंगर उतारावर ते असु शकतात व तेच प्रतिसाद देत असतील म्हणून पुढे पुढे सरकत होतो . पण त्या खालच्या बाजूला टाटा कंपनीचे गार्डन आहे. सुरक्षारक्षक असतात ते सुद्धा प्रतिसाद देऊ शकतात म्हणून द्विधा मनस्थिती झाली.
टाटा कंपनीचे मॅनेजर विश्वास राव साहेब यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली व सुरक्षारक्षक आमच्या दिशेने पाठवायला सांगितले.
आम्ही टिम जोरजोरात आवाज देत होतो व काकांनी तो ऐकुन फायनली मोठ्याने ओरडून प्रतिसाद दिला.
टिम त्यांच्या पर्यंत पोचली ते खुप घाबरलेल्या स्थितीमध्ये होते. पाणी व थोडे स्विट खायला देऊन हाताला धरून धरुन त्यांना परत सुरक्षित कैवल्यधाम येथे आणून सोडले.
पोलिस निरीक्षक सिताराम डुबल साहेब व पोलिस उपनिरीक्षक संदेश बावकार साहेब तो पर्यंत घटनास्थळी पोचले होते.
त्यांनी टिमचे कौतुक केले.
आजची टिम
राजेंद्र कडू , महेश मसने, योगेश उंबरे, योगेश दळवी,अमर ठाकर , राजेश ठाकर, अमित बलकवडे, राहुल दुर्गे , अमोल सुतार, सुनील गायकवाड
Comments
Post a Comment