Two rock climbers die at Hadbi's Shendi near manmad maharashtra february 2022

 Two trekkers die in Nashik while descending peak

Read more at: https://www.deccanherald.com/national/west/two-trekkers-die-in-nashik-while-descending-peak-1077667.html

The deceased have been identified as trekking trainer Anil Wagh (35) and Mayur Mhaske (22), an uncle-nephew duo, who were associated with Ahmednagar-based Indraprastha Trekkers.


हडबीच्या शेंडीवरुन पडून दोन तरुण गिर्यारोहक ठार; एक जण जखमी

https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/two-climbers-were-killed-and-one-was-injured-in-an-accident-at-hadabi-shendi-hill-rak94

Location   Manmad.

 Name of the Pinnacle  or  Face   Hadbi chi Shendi.

Hadbi chi Shendi  826 m Elevation

Location 20.21518 N  74.406309 E

-------------------------------------------------------------------------------------------------------

Piyush Gangele

18 h  · 

काल 2 फेब्रूवारी रोजी मनमाड नाजिक च्या हडबिची शेंडी जो आमचा रोजच्या सरावाचा हिस्सा आहे.. या सुप्रसिद्ध गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षित करत असतो.. अश्या या सुळक्यावर काल नगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स चे संयोजक श्री. अनिल शिवाजी वाघ व त्यांचा भाचा असलेला सहकारी जे की गिर्यारोहणा संदर्भात नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते.. यांचा event closing करतांना की बोल्ट दगडासह निसटल्याने खाली पन्नास फूट कोसळले... त्यात हे दोघेही गतप्राण झाले..  काल सायंकाळी 7 वाजेळा मला NCRA जी संस्था rescue साठी आम्ही सारे मिळून काम करतो त्याचे  दयानंद कोळी सरांचा फोन आला व झालेल्या घटनेची माहिती मिळाली..मी तत्काळ घटना स्थळी रवाना झालो.. तेथे जण्या आधी त्या ठिकाणचे आमचे मित्र भागवत झालटे... हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह हजर होते.. सदर जागेवर सगळ्यात आधी अनिल वाघ यांच्या सोबतचे विद्यार्थी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आरडा ओरडा करीत होते... त्यांना खाली उतरवण्यास सुरवात केली..... त्या नंतर मयूर म्हस्के हे जवळच पडलेले होते...ते जागीच गतप्राण झाले होते... त्यांना खाटेवर टाकून चार युवक खाली घेउन गेले. .v पुन्हा बाज वर घेउन गेले...त्या नंतर अंधारात अनिल वाघ हे दिसत नव्हते...त्या मुळे त्यांना शोधण्यास बराच वेळ लागला.. ते अडचणीच्या जागेवर तसेच तीव्र उतारावर झाडाला अडकून पडले होते.. त्या वेळेस त्यांचें डोळे हलत होते... करिता त्यांना तातडीने खाटेवर टाकून खाली आणण्यास सुरुवात केली , परंतु  तीव्र उतार व सुकलेल्या गवतावरून निस्टायला होत होते..चालणे अवघड होत असताना  वेळ लागत होता.. तरीही या युवक मित्रांनी  सामाजिक बांधिलकी जपत  अतिशय नेटाने  त्यांना खाली आणले... व तातडीने ambulance द्वारे रुग्णालयात हलवले... परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले... या संदर्भात सुरक्षा उपाय योजना नसणे तसेच या दोघा ट्रेनर व्यतिरिक्त साधे प्रथमोपचार माहीत असलेले पण कोणी नव्हते... प्रस्तरारोहण साठी वापरलेला की बोल्ट भरपूर जुना होता.... ती काळजी घेतली गेली पाहिजे.. !!!

शुर प्रस्तरारोही वीरांना मी  नासिक climbers rescue association तर्फे 

भावपूर्ण श्रध्दांजली...!!

https://www.facebook.com/100001028200314/posts/5159229720787917/?sfnsn=wiwspwa&ref=share


Prashant Rajaram Pardeshi

1h  · 

धरू या कास सुरक्षित गिर्यारोहणाची

गाठूया उंची नव्या साहसाची

अपघात झालाय! संवेदनशील मने कळवळलीत! पण त्यामुळे बंदी घालण्याचा विचार अविवेकी आहे. नासिक जिल्ह्यात मनमाड जवळच्या हडबीच्या शेंडीवर बुधवारी दोन गिर्यारोहक सुळका सर केल्यानंतर उतरत असताना पडून दुर्दैवीरित्या मरण पावले आणि येणे प्रमाणे चर्चा सुरू झाली ती या स्थळावर बंदी घालण्याची. बंदी म्हणजे काय तर तिथे गिर्यारोहण करण्यास मज्जाव करण्याची!

असं चालतच नाही! 'थोडंसं', 'चुकून' या शब्दांनाही जिथे वाव नाही त्या 

गिर्यारोहणातला हा अतिशय दुर्मिळ स्वरूपातला अपघात. अती उंचीवरच्या 

गिर्यारोहणात जिथे उतरतांना होणारे अपघात हे डोंगर चढून जाताना होणार्‍या 

अपघातापेक्षा जास्त आहेत. त्या उलट सह्याद्रीत उतरताना होणार्‍या अपघातांची संख्या चढताना होणार्‍या अपघातांपेक्षा कमी आहे, पण खरं बघितलं तर मुळात गिर्यारोहण करताना होणार्‍या अपघातांची संख्याच खुप कमी, इतकी की हजार मोहिमात एखादी दूसरी. अती उंचीवरच्या गिर्यारोहणात दहा मोहिमात एक, दहा मोहिमात चार इतकी ती संख्या कमालीची मोठी आहे. त्या उलट सह्याद्रीत गिर्यारोहण करताना होणार्‍या अपघातांपेक्षा पर्यटकांना होणार्‍या अपघातांचे प्रमाण हे नव्व्यांण्णव टक्क्याहून अधिक असावे. इथे तर स्वताचे छायाचित्र काढताना भरमसाठ अपघात झाल्याच्या घटना भरपूर आहेत.

अपघात झाल्यामुळे बंदी घालूनही चालत नाही. तसे असते तर आपल्या महामार्गांना मृत्यूचे सापळेच म्हंटले गेले असते. डोंगरांवर होणार्‍या अपघातांची तुलना केली तर निश्चीतपणे रस्त्यावर होणार्‍या अपघातांचे प्रमाण खुप जास्त आहे. अपघाताची कारण मिमांसा व्हायला हवी. एक तर तो कसा झाला किंवा कसा झाला असावा? याचा तपास व्हायला हवा. 

हडबीची शेंडी म्हणजे सह्याद्रीचे अत्यंत मनोहारी रूप. शुभेच्छा करण्यासाठी वापरतात तशा अंगठ्याच्या स्वरूपात असलेला हा सुळका मनमाड परिसरात अगदी लांबूनही लक्ष वेधून घेतो. तुम्ही आम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी माध्यमांवर याचे भावचित्र (emoji) अनेकदा  वापरले असेल. हा सुळका पाहून रेल्वे प्रवासात अगदी दुरून वर्दी मिळते, मनमाड शहर जवळ आल्याची. 'या सुळक्यावर माणूस चढून जातो', ही कल्पनाच रोमांचित करणारी. आपली गिर्यारोहक मंडळी अगदी आरामात हा सुळका चढून जातात. या सुळक्याचे दगड ठिसूळ स्वरूपात आहेत, हे कारण बंदी घालण्याकरिता पुढे करण्यात आले आहे. बुधवारी नगरच्या अनिल वाघ व मयूर म्हस्के या मामा-भाचांचा गिर्यारोहण करून उतरताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कोणी म्हणतं, ज्या दगडाला खिळा ठोकलेला होता तो दगड निखळला. 

हे खरे आहे की, हडबीच्या शेंडीचे दगड ठिसूळ स्वरूपाचे आहेत. मुळात सह्याद्री हा अग्नीजन्य प्रक्रियेतून घडलेला आहे अनेक ठिकाणी तो लोखंडासारखा टणक आहे तर काही ठिकाणी ठिसूळ, मुरमाड स्वरूपाचा. त्याचे खडक उन पावसात धुप होऊन तडकत सातत्याने सुटे होत आहेत पण काही ठिकाणी हे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त बघायला मिळते. त्यापेक्षा जास्त ठिसूळपणा हिमालयीन डोंगरांचा आहे. डोंगरांचे दगड निखळणे ही साधारण प्रक्रिया आहे. कोकण रेल्वे मार्गार दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला दरडी कोसळतात, कोकण रेल्वेचा मार्ग दरड प्रवण आहे, तशा स्वरूपाचे दगड हडबीच्या शेंडीवरून नित्य नियमाने निखळत नाहीत. मुळात त्यावर आरोहण करणार्‍या गिर्यारोहकांची संख्या अतिशय कमी आहे. गिर्यारोहणाच्या लेखी हा सुळका मध्यम श्रेणीत मोडतो.

अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ गिर्यारोहण संघाने व्यावसायिक स्वरपाची मोहिम हा सुळका चढून जाण्यासाठी ठेवली होती. १८ जण त्यात सहभागी झाले होते. मोहिम व्यावसायिक स्वरूपाची असल्याने सहभागींना पैसे मोजून त्यात सहभागी करून घेण्यात आले होते. अशा स्वरूपात सशुल्क साहसी मोहिमांचे आयोजन नेहमीच केले जाते. आता प्रश्न हा आहे की, हडबीच्या शेंडी सारख्या ठिकाणी सशुल्क साहसी मोहिमांचे आयोजन व्हावे की नाही, तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. 

गिर्यारोहण या साहसी खेळाचे संकेत हे पाळले जायला हवे. काही ठिकाणे हे सशुल्क मोहिमांसाठी नाहीत. आपल्याकडे भर धबधब्यातून सहभागी मंडळींना गिर्यारोहण साहित्याच्या मदतीने उतरविले जाते. त्यानिमीत्ताने ज्यांचे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण झालेले नाही अशा सर्वसामान्य लोकांनाही साहसाची अनूभूती दिली जाते. काही डोंगरकड्यांवरून लोकांना खाली उतरविले जाते किंवा काही ठिकाणी कमरेला दोर बांधून डोंगरांच्या दोन टोकांना बांधलेल्या दोरावरून वरच्या भागातून खालच्या भागात सोडले जाते. जसे लोक गोव्याला किंवा कोकणातल्या सागरी किनार्‍यावर जाऊन पॅरासेलिंग किंवा मोटर बोट किंवा जीपला बांधून बलून सेलिंगचा आनंद घेतात तशा स्वरूपाचा हा लोकांना साहसाची अनूभूती देणारा, पर्यटनास चालना देणारा गिर्यारोहणाचा, सुळके आरोहणाचा उपक्रम. उत्तर भारतात कुलू, मनाली, शिमला आदी ठिकाणे अशा साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत. वर्षभर त्यासाठी लोकांची रेलचेल तिथे बघायला मिळते. सह्याद्रीत कोणत्या ठिकाणी सशुल्क सार्वजनिक साहसी उपक्रम केले जाऊ शकतात यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, महाराष्ट्र अॅडव्हेंचर कौन्सील सारख्या 

राज्यातील शिखर संस्थांच्या मदतीने अशा स्थळांची निश्चीती केली जावी. या दोन संस्था राज्य शासनास साहसी खेळ व पर्यटन धोरण तयार करण्यास सहाय्य करत आहेत. या खेळात अपघात टाळण्याच्या दृष्टीने नियमावली अगोदरच तयार केली गेली आहे. त्याचा मसुदा अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी राज्याच्या विविध भागात या खेळाशी निगडीत संस्था, खासगी आयोजक आणि प्रशिक्षकांशी अनेकठिकाणी चर्चासत्र, बैठका झाल्या, सूचना, हरकती मागवून हा मसूदा राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे पाठविण्यात आला. आता तो लागू झाला तर साहसी खेळ उपक्रम आयोजकांना काटेकोर नियमावली स्विकारावी लागेल. 

हडबीच्या शेंडीवर झालेल्या अपघाताचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी जाऊन तपास करायला हवा म्हणजे भविष्यात आयोजित केल्या जाणार्‍या मोहिंमात सावधगिरी बाळगता येईल. मनमाड येथे बचाव कार्य करणार्‍या गिर्यारोहक व ग्रामस्थांच्या मते दगड आणि खिळा निसटून अपघात झाला. गिर्यारोहण क्षेत्रातील अनूभवींच्या मते आवरोहण करताना ज्या कडीतून सुट्टा दोर ओवला होता ती कडी दहा पंधरा वर्षे जुनी असेल आणि त्यावर खुप जास्त भार पडला असेल तर ती निश्चीत पणे निखळून येऊ शकते. 'अमागिम' व 'मॅक' यांनी आदर्श आचरण पद्धती (sop)तयार केल्या आहेत, त्याचे पालन करणे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. गिर्यारोहणात खडकात हाताने ठोकलेले किंवा ड्रिल यंत्राच्या सहाय्याने ठोकलेले प्रसरणात्मक खिळे (expansion bolt) हे अतिशय मजबूत असतात. हे खिळे दहा पंधरा वर्षांपासून वापरात आहेत. safe climbing initiative (स्की) सारख्या खासकी संस्थांनी रासायनिक पद्दतीने 

सह्याद्रीतल्या अनेक आरोहण मार्गावर केमिकल बोल्टींग केले आहे, ज्यांची मजबूती वादातित आहे. कोकणकड्यावर तीस पस्तीत वर्षांपूर्वी प्रथम आरोहण करताना मारलेल्या बोल्ट्‌सचा अजूनही गिर्यारोहक वापर करतात इतके ते मजबूत आहेत, हे सगळे खरे असले तरी, ''आदर्श आचरण पद्धत'' पाळण्यात चूक झाली का याची कारणमिमांसा होण्याची गरज आहे, प्रत्येक आयोजकाची ती जबाबदारी आहे. इथे प्रश्न हा लोकांच्या जिवाचा असतो, तांत्रिक मोहिमेच्या नेत्यांना अपघात होणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारे नेत्यांना अपघात झाल्याच्या अलिकडे काही घटना घडल्या आहेत. अलंग किल्ल्यावर अशीच एक दुर्घटना अलिकडे घडली होती, सुदैवाने त्यात जिवीत हानी झाली नाही. गिर्यारोहणात एकाच वेळी तीन ठिकाणी दोर बांधण्याची प्रथा हा आदर्श आचरण पद्धतीचा भाग आहे, याचे कारण म्हणजे एकाच खिळ्यावर सगळा भार येत नाही, काही कारणामुळे समजा तो निखळलाच तर बाकीचे दोन खिळे दोर पकडून ठेवू शकतात. उतरत असताना अगोदर मारलेला खिळा वापरताना त्याची मजबूती ही तपासून बघण्याची आवश्यकता असते. बर्‍याचदा 

सहभागींना सराव नसल्याने ते हिसके मारत उतरतात, ही पद्दत अतिशय चुकीची आहे. 'तयार आरोहण मार्गावर', मोहिमेचे आयोजन करताना सोबत प्रसरणात्मक खिळ्यांसह मेखा आदी आरोहण साहित्य नेणे गरजेचे आहे. बर्‍याचदा हाताने ठोकलेला खिळा दगडात हवा तसा बसत नाही, अशा वेळेस त्याची मजबूती त्वरीत तपासली जावी. या संदर्भात प्रसिद्द गिर्यारोहक सूरज मालूसरे यांनी सांगितले की, एकदा अलंग किल्ल्यावर शेवटचा गडी म्हणून उतरत असताना त्याने हाताने एक कडी दगडात ठोकली. ती व्यवस्थित बसली नसावी म्हणून त्याने त्यातून दोर ओवून खाली तिन जणांना त्यावर भार देण्यास सांगितले व त्या कडीची मजबूती तपासली. मोहिम गुंडाळताना समांतर आवरोहण करताना खुप काळजी घ्यायला हवी. एका वेळी दोन जणांनी शक्यतो उतरू नये, जुना खिळा असेल तर जोखिम पत्कारायला नको. 

हडबीच्या शेंडीच्या अपघातात मामा भाच्यांकडून तांत्रिक संकेताचे उल्लंघन झाले असेल तर त्याचा तपास होणे गरजेचे आहे. हा अपघात कसा घडले हे कोणीही सांगू शकत नाही. मुख्य आरोहण मार्गाच्या पलिकडच्या बाजूस त्यांचे मृतदेह सापडले, ही आश्चर्याची गोष्ट आहे. एकाच कडीतून दोर यू करून उतरले जात होते का...तीच कडी निखळली का या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत. साधारण पणे शंभर फुटावरून त्यांचा फॉल झाल्याची माहिती प्राप्त झाली, या बाबींचा उहापोह करणे गरजेचे आहे. डोंगरावरच्या प्रत्येक अपघातांची कारणमिमांसा ही भविष्यातील मोहिमांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची ठरते, त्याने आपण अपघात टाळू शकतो, बंदी हा उपाय असू शकत नाही. पाश्चात्य जगतातले साहसवीर साहसाची नवनवी उंची गाठत असताना आपल्या साहसवीरांना मागे खेचून चालणार नाही. 

।।मृत गिर्यारोहकांना भावपूर्ण श्रद्धांजली।। 

अशी वेळ कुणावरही येऊ नये. त्यांच्या कुटुंबिय व आत्पजनांना या कठिण प्रसंगात सावरण्याचे बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. मनमाडचे गिर्यारोहक व कातारवाडी ग्रामस्थांनी अपघातात तत्परतेने धावून अतिशय अवघड ठिकाणी जाऊन बचाव कार्य केले, तिथले सरपंच संसारे व त्यांच्या सहकार्‍यांनी सहभागींना धीर दिला, त्यांचे आभार.

धरू या कास सुरक्षित गिर्यारोहणाची

गाठूया उंची नव्या साहसाची...

।।जय हो।।

पाऊलखुणा, ४.२.२०२२

---

#climb_safe #Akhil_Maharashtra_Giryarohan_Mahasangh  #Maharashtra_Adventure_Council  #hadbi_chi_Shendi_pinnacle

https://www.facebook.com/story.php?story_fbid=10226946406909123&id=1321972767&sfnsn=wiwspwa

Sanjay Marne


  · 24 m  · 

सर्व बाबींची सखोल आणि सविस्तर चर्चा 

१) अनेक ट्रेकर्सचे लोड घेतल्या मुळे त्या बोल्टवर फटीग लोड येते। तो बोल्ट ढिला होतो आहे का? याकडे कुणाचेही लक्ष नसते.

२) बोल्ट ठोकताना त्यामध्ये इपोक्सि वापरलेले नसते, बोल्ट फक्त फ्रिक्शन वर दगडात अडकलेला असतो, ते फ्रिक्शन नक्की कुठे आहे आणि किती पक्के आहे? याची बोल्ट ठोकणाऱ्या व्यक्तीला कल्पना नसते.

३) बोल्ट आतमध्ये गंजून जाऊ शकतो. तो किती गंजला आहे याची बाहेरून कल्पना येत नाही।

४) बोल्ट माईल्ड स्टीलचा असेल तर तो त्यावर जास्तीचे लोड आल्यावर तुटत नाही, तो वाकायला लागतो। तो जास्त सुरक्षित असतो। पण सध्या वापरात असलेले बोल्टस् माईल्ड स्टीलचे नसतात, ते गंजून जाऊ नयेत म्हणून अलॉय मेटलचे वापरतात, ते ब्रिटल असतात, ते लोड आल्यावर वाकत नाहीत, ते थेट तुटतात।

५) ज्या दगडात बोल्ट मारले जातात, त्या भागाचे सॉईल टेस्टिंग झालेले नसते, त्या विशिष्ठ ठिकाणची दगडांची बेअरिंग कपॅसिटी मोजली जात नाही.

६) रॅपलिंग किंवा क्लाइंबिंग करताना जी हेल्मेटस वापरली जातात, ती त्या ऍक्टिव्हिटी करता डिझाईन केलेली नसतात, उंचावरून दगड पडला तर ती प्लॅस्टिकची हेल्मेट्स सहज तुटू शकतात आणि कपाळमोक्ष होऊ शकतो। या ऍक्टिव्हिटी साठी 9mm बोअर साठी वापरले जाणारे मिलिटरी साठी डिझाईन केलेले हेल्मेट वापरणे आवश्यक आहे। 

७)या ऍक्टिव्हिटीज निरनिराळ्या प्रकारच्या दगडांमध्ये निरनिराळ्या पद्धतीत काळजी घेऊन करण्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचे पूर्ण नॉलेज सध्या कुणाही कडे नाही।

८) बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी शिकविल्या जातात त्या हिमालयातील  बर्फाच्छादित शिखराच्या खाली असलेल्या काळ्या सँड स्टोन या दगडा मध्ये तुम्ही या ऍक्टिव्हिटी करणार आहात असे गृहीत धरून शिकविल्या जातात।

९) महाराष्ट्रात सर्वच शिखरं काळ्या डेक्कन बसाल्ट पासून तयार झालेली नाहीत, बरीच शिखरं ठिसूळ अशा अमिग्डोलायडल बसाल्ट किंवा मांजऱ्या दगडापासून तयार झालेली आहेत.

१०) हे सुळके ठिसूळ असल्यामुळे मूळ डोंगरांपासून दगडांची झीज होऊन वेगळे झालेले आहेत। याचा कोणताही अभ्यास climbers करीत नाहीत। 

११) या व्यतिरिक्त जास्त लोकं घेऊन गेल्यामुळे होणारी ऑर्गनायझर्सची दमछाक आणि निसटत चाललेले बोल्टस, हे अपघाताचे मुख्य कारण बनतात.

https://www.facebook.com/groups/1879620169023234/permalink/3107072299611342/?sfnsn=wiwspwa&ref=share




Comments

Popular posts from this blog

unfortunate incident at Harishchandragad 1st August 2023 report by harishchgandragad guide balu

Engineering student from Malegaon slips and dies at salhar fort at balgan 16th July 2022